एक हजार बड्या थकबाकीदारांची मनपाची यादी वसुलीसाठी तयार:162 कोटींच्या थकीत कर वसुलीसाठी सरसावले प्रशासन
2 hours ago
1
महापालिकेची १६२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत असून, त्याच्या वसुलीसाठी महापालिका सरसावली असून, शहरातील प्रत्येकी पन्नास हजार रुपयांवर थकबाकी असलेल्या बड्या एक हजार मालमत्ता धारकांची बुधवारी यादी मनपाने तयार केली आहे. या बड्या मालमत्ताधारकांना लक्ष्य करून अधिक वसुली कशी होईल, याकडे महापालिकेने आपला मोर्चा वळवला आहे. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाची चालू वार्षिक मागणी व मागील थकबाकी सुमारे १९६ रुपये होती. गतवर्षी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत यापूर्वी नियुक्त स्वाती इंडस्ट्रीज या खासगी कंपनीने केवळ ३४ कोटी रुपयांची वसुली केली आहे. आर्थिक वर्ष संपायला आता केवळ ७२ दिवस उरले आहेत. या ७२ दिवसांत१ लाख ७१ हजार मालमत्ताधारकांकडून १६२ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणे अवघडच नाही तर अशक्य आहे. दररोज २.२२ कोटी रुपये वसूल करावे लागतील. कर वसुलीला गुरुवारपासून गती देण्यात येणार असून, त्यासाठी मनपाच्या कर विभागातील कर्मचाऱ्यांना पॉस मशीन देण्यात येणार आहेत. कर्मचारी घरोघरी तसेच प्रभागात फिरुन वसुली करणार आहेत. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांनी कमी दिवसांत कर वसुलीचे मोठे आव्हान पाहता या कर विभागाच्या मदतीला विविध विभागातील १५० कर्मचारी दिले आहेत. त्यांची ऑर्डर काढली असून, तीन महिन्यांसाठी या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नियुक्त केलेले कर्मचारी त्यांचे कार्यालयीन काम सांभाळून कर वसुलीच्या कामातसुद्धा कर विभागाला मदत करणार आहेत. महापालिकेचे मुख्य कार्यालय व चारही झोन कार्यालयात मालमत्ता थकबाकी वसुलीचे काम सुरू झाले आहे. शनिवार आणि रविवारीही महापालिकेची सर्व झोन कार्यालये आणि महापालिकेच्या मुख्य कार्यालयात कर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या कर वसुलीत गती आणण्यासाठी व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कर वसुलीसाठी या विभागाला अतिरिक्त कर्मचारी वर्ग देण्याचे नियोजन केले आहे. शास्ती अभय योजनेमुळे नागरिकांना प्रोत्साहन मिळेल व वसुलीत वाढ होईल, असे महापालिका आयुक्त सुनील लहाने यांनी सांगितले. महिना शास्तीवर सूट (व्याज माफ) २० ते ३१ जाने. १०० टक्के १ ते २८ फेब्रु. ९० टक्के १ ते १५ मार्च ८० टक्के १६ ते ३१ मार्च ७५ टक्के विशेष सवलत योजना थकबाकीदारांकडून कर वसुलीवर भर देणार ^महापालिका प्रशासन शहराच्या हद्दीत असलेल्या एक हजार बड्या कर थकबाकीदारांकडून कर वसूल करण्याचा विचार करत आहे. त्यांची यादी मालमत्ता कर विभागाने बुधवारी तयार केली असून, प्रभागनिहाय नियुक्त वसुली कर्मचाऱ्यांना या याद्या देण्यात येणार असून, सर्वप्रथम या बड्या थकबाकीदारांकडून कर वसुलीवर भर दिला जाणार आहे. ज्यामुळे कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यास मदत होईल. - विजय पारतवार, मालमत्ता कर अधीक्षक, मनपा.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)