एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद:मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता

2 hours ago 1
मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दोघांकडून मुख्यमंत्री पदावर दावा केला जात आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे, यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत. तर भाजपकडे सर्वाधिक 132 आमदार असल्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यातच मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. अशात एकनाथ शिंदे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्रात कुणाच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन होणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भाजपला एकट्याला बहुमताच्या आसपास जागा मिळाल्यात. विशेषतः अजित पवार यांनीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. त्यानंतरही महायुतीने आपला नवा कारभारी घोषित केला नाही. सूत्रांच्या मते, भाजप नेतृत्वाला जातीय समीकरणापासून एनडीएच्या सर्वच सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा आहे. यामुळेच गत 4 दिवसांपासून मुंबईपासून दिल्लीपर्यंत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेत भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. तर शिवसेनेला 57 व राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. भाजपने या निवडणुकीत आपले 149 उमेदवार दिले होते. तर शिवसेनेने 81 व राष्ट्रवादीने 59 जणांना तिकीट दिले होते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला आहे. एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा दिला आहे. आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा राज्यशकट हाकतील.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article