कपाटात ठेवलेल्या पिस्तुलातून गोळीबार:13 वर्षीय मुलगा जखमी, पोलिसांनी दाखल केला निवृत्त लष्करी जवानावर गुन्हा

1 day ago 1
एका निवृत्त लष्करी जवानाने राहत्या घरात कपाटात ठेवलेल्या रिव्हाॅल्वरला कपाट उघडताना धक्का लागल्याने झालेल्या गोळीबारात एक 13 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना धनकवडीतील वनराई काॅलनी परिसरात घडली. या प्रकरणी निवृत्त जवानाविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अभय नितीन शिर्के (वय 13) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील निवृत्त जवान नितीन हनुमंत शिर्के (वय 40, रा. श्री गणेश अपार्टमेंट, वनराई काॅलनी, धनकवडी, पुणे) यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस हवालदार हेमंत राऊत यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. नितीन शिर्के लष्करातून निवृत्त झालेले आहेत. सध्या ते सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतात. शिर्के यांच्याकडे शस्त्र परवाना देखील आहे. त्यांनी त्यांची रिव्हाॅल्वर कपाटातील एका पिशवीत ठेवली हाेती. रिव्हाॅल्वरमध्ये गोळ्या भरलेल्या होत्या. शिर्के यांचा 13 वर्षीय मुलगा अभय एका इयत्ता सातवीत आहे. मंगळवारी दुपारी तो घरात होता. दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास अभयने कपाट उघडले. रिव्हाॅल्वर ठेवलेल्या पिशवीला आचनक धक्का लागला आणि पिशवी जमीनीवर पडली. रिव्हाॅल्वरचा चापावर दाब पडला आणि गोळीबार झाला. रिव्हाॅल्वरमधून सुटलेली एक गोळी अभयच्या पायातून आरपार गेली. त्यावेळी अभयची आई आणि लहान भाऊ घरात होते. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलाचे वडील निवृत्त जवान नितीन शिर्के यांच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील याबाबत पुढील तपास करत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article