कीटकजन्य आजारांबाबत नवरात्रोत्सवात जनजागृती:पाणी साचलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्याची धडक मोहिम राबवणार‎

1 hour ago 1
जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्याबाबत ३ सप्टेंबरला सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सव कार्यक्रमात राष्ट्रीय कीटकजन्य आजाराविषयी जनजागृतीपर एकदिवसीय कार्यक्रम ४ ते ११ ऑक्टोबरपर्यंत घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये देवी मंडळाच्या ठिकाणी जनजागृती करणे, ग्रामपंचायतीत राष्ट्रीय कीटकजन्य आजाराविषयी आरोग्य शिक्षण देणे, शाळांमध्ये मुलांना डेंग्यू आजाराबद्दल माहिती देणे, गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम राबवणे, कापडाचे ऑइल बॉल तयार करून पाणी साचलेल्या ठिकाणी सोडण्याची कार्यवाही करणे, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविकांना घेवून महिला सभा आयोजित करून आरोग्य शिक्षण देणे व ग्रामपंचायत स्तरावर गप्पी मासे पैदास केंद्र तयार करणे इत्यादी कार्यक्रम नवरात्र उत्सवामध्ये जनजागृतीपर घेण्यात येणार आहेत. हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या इत्यादी कीटकजन्य आजाराविषयी समाजामध्ये जनजागृती निर्माण होऊन त्यांच्या प्रतिरोधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीत जनतेच्या सक्रिय सहभाग प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. कार्यक्रमात जास्तीत जास्त लोक सहभाग घेवून जनजागृती करण्यात येणार आहे व त्यामध्ये ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका यांचा सहभाग घेऊन एकदिवसीय कार्यक्रम नेमून दिल्याप्रमाणे कार्यक्षेत्रात जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. नवरात्री उत्सवात जनजागृतीपर कार्यक्रमांतर्गत आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा. त्यामध्ये सर्व पाण्याचे साठे व भांडी घासून पुसून कोरडी केली जावी व सर्व पाणी साठे झाकून किंवा कापडाने घट्ट बांधून ठेवण्यात यावेत. यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत होईल, असे जिल्हा हिवताप अधिकारी अकोला डॉ. अतुल बी. शंकरवार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article