केंद्रीय आरोग्य विभाग पथकाने बाळापूर रुग्णालयास दिली भेट:आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी दिल्या सूचना
2 hours ago
2
केंद्रीय आरोग्य विभागाच्या पथकाने बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात २८ नोव्हेंबर रोजी भेट देऊन आढावा घेतला. ‘सीआरएम’ (कॉमन रिव्हयू मिशन) पथकाने येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना उपचारादरम्यान पुरवण्यात येत असलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. तसेच रुग्णालयात त्या आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याबाबत काही सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या. ग्रामीण रुग्णालयामधील आरोग्य विभागामध्ये कमतरता असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती जाणून घेण्यात आली तसेच बाळापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये २० अशा सेविकांची गरज असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ रिज़वाना खान यांच्याकडून देण्यात आली. केंद्र सरकार आरोग्य विभागाच्या ‘सीआरएम’ पथकाने ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट, औषधी भंडार, सामान्य रुग्णालय वॉर्ड तसेच आरोग्य विभागाच्या ॲम्बुलन्स यांची पूर्ण तपासणी करून पूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी बाळापूर येथील आरोग्य टीमचे श्रीकृष्ण वासुदेव सोनवणे यांनी ‘एचआयव्ही’वर कविता सादर करून मन जिंकले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)