Published on
:
20 Nov 2024, 2:32 pm
Updated on
:
20 Nov 2024, 2:32 pm
केज : केज विधानसभा निवडणुकीत सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ५९.४५ टक्के मतदान झाले. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. मात्र विडा येथे मतदान केंद्राबाहेर दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. तर विधान सभेच्या निवडणुकीत लोकसभेप्रमाणे मतदारांमध्ये उत्साह जाणवला नाही.
केज मतदार संघात ३ लाख ८७ हजार २२१ मतदारांना मतदान करण्यासाठी ४२० मतदान केंद्र होते. सायंकाळी ५:०० वा. पर्यंत ३ लाख ८७ हजार २२१ मतदरांपैकी १ लाख २० हजार ८५३ पुरुष तर १ लाख ९ हजार ३३३ स्त्री आणि एका तृतीय पंथी असे एकूण २ लाख ३० हजार १८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानाच्या ५९.४५ टक्के एवढे मतदान पार पडले.
मतदार संघात दिव्यांग आणि नवमतदारांमध्ये उत्साह जाणवला परंतु ऊस तोडणीसाठी साखर कारखान्याकडे स्थलांतरित झालेले मतदार हे मतदानासाठी न आल्याने मतदानाचा टक्का घटला असल्याची चर्चा आहे. मतदान शांततेत मतदान पार पडले. मात्र विडा या गावात मतदान केंद्रा बाहेर दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. दरम्यान मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडून मतदानात व्यत्यय आल्याची एकही घटना घडलेली नाही. दरम्यान मतदारसंघात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त आणि सीमा सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या होत्या. रात्री उशिरा पर्यंत स्ट्राँग रूम मध्ये मतदान पेट्या येत आहेत.