North Maharashtra Election Results 2024 LIVE: मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात, उत्तर महाराष्ट्रात कोणी घेतली आघाडी

3 hours ago 1

| Updated on: Nov 23, 2024 | 6:58 AM

North Maharashtra Assembly Constituency Election Results 2024 LIVE Updates successful Marathi: उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्हे येतात. विधानसभा निवडणुकीत या भागात संमिश्र निकाल राहिले आहेत. आता २०२४ विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी की महायुतील कोणाला या भागातील जनता साथ देते, ते आज स्पष्ट होणार आहे.

 मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात, उत्तर महाराष्ट्रात कोणी घेतली आघाडी

North Maharashtra Election Result

LIVE NEWS & UPDATES

  • 23 Nov 2024 06:58 AM (IST)

    मतमोजणीची तयारी पूर्ण, थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

    उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

MLA Vidhan Sabha Election Result 2024 LIVE Updates: गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रातील निवडणुकीची चर्चा सुरु होती. आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. राज्यात 4,136 उमेदवारांनी निवडणूक लढवली. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. मतदारांनी यंदा विक्रमी मतदान केले. यामुळे गेल्या 30 वर्षांचा विक्रम मोडला गेला. राज्यात जास्त झालेल्या मतदानाचा फायदा कोणाला मिळाला? ते आज समोर येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात चुरशीच्या लढती झाल्या. नंदुरबार जिल्ह्यात चार, धुळे जिल्ह्यात पाच, जळगाव जिल्ह्यात ११, नाशिक जिल्ह्यात १५ तर अहिल्यानगर जिल्ह्यात १२ विधानसभा मतदार संघ आहे. उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत आहे.

Published On - Nov 23,2024 6:56 AM

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article