कोयत्याचा धाक दाखवून टॅम्पो चालकाचे अडीच लाख लुटले

4 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

05 Oct 2024, 6:21 pm

Updated on

05 Oct 2024, 6:21 pm

टेंभुर्णी : पंढरपूर-टेंभुर्णी महामार्गावर येथील परिते जवळ टॅम्पो चालकास कोयत्याचा धाक दाखवून अडीच लाख लुटल्याची घटना समोर आली आहे. याबरोबरच त्याच्यावर कोयत्याने वार करुन त्याला जखमी देखील करण्यात आले आहे. ही घटना परिते गावच्या बस स्थानकाजवळ शुक्रवारी (दि.4) मध्यरात्री रात्री १२.४५ वा.घडली आहे.या घटनेने खळबळ उडाली आहे.

याबाबत संदीप पवड्याप्पा जाधव (वय-३२) रा.जैनापूर ता.बागेवाडी जि.विजयपूर याने फिर्याद दिली आहे.यामध्ये त्याने म्हटले आहे की,तो बकरे खरेदी करण्याचा व्यवसाय करीत असून तो शहनवाझ महमंदसाब चैलेगिद्द (रा.आझादनगर बागेवाडी जि.विजयपूर,कर्नाटक) या मित्राबरोबर बकरे खरेदी करण्यासाठी चाकण (पुणे) येथे त्यांच्याकडील पिकअप जीप (क्र.केए-२८ एए -८८१०) मधून स्वतः चालवीत निघाले होते. वतर त्यांचा चालक रमेश गणपत गिड्डे हा मागे हौद्यात झोपलेला होता.ते टेंभुर्णीकडे येत असताना माढा तालुक्यातील परिते बसस्थानका जवळील गतिरोधका जवळ पिकअपचा वेग कमी होताच अज्ञात दोघा चोरट्यानी त्यांच्याकडील लाल रंगाची पल्सर दुचाकी पुढे आणून पिकअप जीपला आडवी लावली.तू आम्हाला कट मारतोस काय म्हणत शिवीगाळ केली.

खाली उतर म्हणून कोयत्या सारख्या हत्याराने पायावर हातावर मारहाण करून त्यास व त्याचा मित्र शहानवाज चैलेगिद्द या दोघांना जखमी केले.तसेच कोयत्याचा धाक दाखवून दोघांची झडती घेतली.बकरे खरेदी करण्यासाठी आणलेले संदीप जाधव कडील एक लाख रुपये व महंमदसाब यांच्याकडील एक लाख पन्नास हजार रुपये असे रोख अडीच लाख व सात हजारांचे दोघांकडील दोन मोबाईल असा मुद्देमाल धाक दाखवून जबरदस्तीने लुटून ते क्षणार्धात पसार झाले.या गंभीर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. संदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून सपोनि गिरीष जोग व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी या घटनेचा तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article