गिरगावात तपासासाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की:चौघांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

5 hours ago 1
वसमत तालुक्यातील गिरगाव शिवारात तपासासाठी गेलेल्या उपनिरीक्षकासह जमादारास धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. २२ पहाटे चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरगाव येथील एका चौकात ताटव्याचे हॉटेल आहे. गुरुवारी ता. २२ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी आलेल्या चौघांचा तेथील काही व्यक्तींसोबत वाद झाला. या वादानंतर किरकोळ हाणामारी झाली. यावेळी चौघांनी रागाच्या भरात ताटव्याचे हॉटेल पेटवून दिले. यामुळे एकच गोंधळ उडाला. आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलास पाचारण करावे लागले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुरुंदा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रविण आगलावे, जमादार भालेराव यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तेथे वाद झालेल्या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पोलिसांनी दोघांनाही तक्रार देण्याबाबत सुचना दिली. मात्र यावेळी चौकशी करीत असतांना पांडूरंग नादरे व इतर तिघांनी सदरची घटना आम्हीच केली असल्याचे सांगत पोलिसांसोबतच हुज्जत घालण्यास सुरवात केली. पोलिस त्यांना समजावून सांगत असतांना त्यांनी पोलिस पथकाला अश्‍लिल भाषेत शिवागीळ करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच पोलिस पथकाशी झटापट करून त्यांना ढकलून दिले. त्यानंतर तेथून पळ काढला. या प्रकरणी उपनिरीक्षक आगलावे यांनी आज पहाटे कुरुंदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी पांडूरंग नादरे व इतर तिघांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक कारामंुंगे पुढील तपास करीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article