चिखली मेहकर रोडवर बंद पडलेल्या बसवर दुचाकी धडकली:दुर्घटनेत तीन युवकांचा जागीच मृत्यू

1 hour ago 1
चिखली मेहकर रोडवर वरदडा फाट्याजवळ आदिवासी पारधी शाळेजवळ मोठा अपघात झाला आहे. येथील आदिवासी शाळेजवळ बंद पडलेल्या बसवर पाठीमागून येणारी दुचाकी जोरदार धडकली. यात तीन युवक जागीच ठार झाले असल्याचे उघडकीस आले आहे. हा अपघात मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास झाला. या अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत गोपाल पंढरी सुरडकर (वय 21) रा.बेराला, धनंजय परमेश्वर ठेंग (वय 25) रा.वाघापूर, सुनील सुभाष सोनुने (वय 35) रा.खडक पुरा चिखली, अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत दुचाकी ज्या बंद बसवर धडकली ती बस चिखली आगाराची होती. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची तपासणी करत मृत युवकांचा मृतदेह चिखली येथे पाठवण्यात आले आहे. अपघाताच्या संबंधित ही पण बातमी वाचा आग्रा येथे 2 बसची भीषण टक्कर:1 ठार तर 15 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर​​​​​​ आग्रा येथे मंगळवारी दुपारी रोडवेज आणि खासगी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर 15 प्रवासी जखमी झाले आहेत. काहींची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. वाचा सविस्तर​

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article