चूक दुरुस्तीची विधानसभेत संधी; व्होट जिहादविरूद्ध एकत्र या- संघ:उद्धव ठाकरे हिंदुत्वविरोधी असल्याचा मुद्दाही घराघरात पोहचवणार

6 days ago 3
लोकसभेत केलेल्या चुकीच्या दुरुस्तीची मोठी संधी महाराष्ट्रातील हिंदुंना विधानसभेत मिळणार आहे. तिचा योग्य वापर करा. व्होट जिहादविरुद्ध एकत्र या, असे आवाहन भाजप, संघ परिवारातर्फे करण्यात आले आहे. परिवाराच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राजकीयदृष्ट्या दुर्बल झालेले मुस्लिम पुन्हा शिरजोरीच्या परिस्थितीत आले. हा २०२४ च्या लोकसभेचा सर्वात माेठा धडा आहे. भाजपचा पराभव हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम समाजाने मविआला मतदान केले. पण, हिंदू गाफिल राहिला. आता त्या चुकीचे परिमार्जन करण्याची संधी हिंदुंना येत्या विधानसभेत करता येईल. म्हणून व्होट जिहाद विरूद्ध एकत्र यावे, असे आवाहन आम्ही घराघरापर्यंत पोहोचवत आहोत. मोदी सरकारच्या अनेक योजनांचा लाभ मुस्लिम समाजाने घेतला. परंतु त्याचा कोणताही कृतज्ञभाव मतदानात दिसून आला नाही. यापासून धडा घेत हिंदुंनी सजगपणे मतदान करावे. विधानसभेत हिंदुत्ववादी पक्षांना बळकट करावे, असेही आवाहन केले जात आहे. उद्धव ठाकरे मुस्लिमांचे लांगूलचालन करणारे, हिंदुत्वविरोधी असल्याचाही जोरदार प्रचार केला जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी भाजपला संघाच्या मदतीची गरज नाही, असे वक्तव्य लोकसभेच्या काळात केले होते. त्याचा भाजपला मोठा फटका बसला. देवेंद्र फडणवीसांनी मिनतवारी केल्यावर संघ परिवाराची नाराजी बऱ्यापैकी कमी झाली. परिवार आता भाजपसाठी सक्रियपणे मैदानात उतरत आहे, असेही संघ, भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सावध ऐका पुढल्या हाका; कसेही करून हिंदू समाजाला भ्रमित केले जाईल या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा हिंदुंची दिशाभूल केली जाईल. आरक्षणाचे प्रश्न उपस्थित करून हिंदु समाजाला भ्रमित केले जाईल. कसेही करून जनतेचे लक्ष हिंदुत्वाकडून भरकटवणे हाच प्रयत्न राहाणार आहे. हिंदु समाजामध्ये फुट पाडून मुस्लिमधार्जिण्या आणि मुस्लिम समाजाला बळकट करणे हेच भाजपा विरोधी पक्षांचे धोरण आहे. हे लक्षात घेता हिंदू समाजाने विभाजित न होता, एकत्र येऊन मतदान करावे, असे आवाहन भाजप तसेच संघ परिवाराकडून केले जात आहे. हिंदुंनी संधी सोडू नये लोकसभेला भाजपच्या विरोधात जिंकू शकणाऱ्याला विजयी करण्यासाठी मुस्लिमांनी एकगठ्ठा मतदान केले. आता हिंदूंनीही एकजूट होवून हिंदू म्हणून मतदान करण्याची संधी विधानसभेत चालून आली आहे. ती हिंदूंनी सोडू नये. चंदन गोस्वामी, प्रदेश प्रवक्ते,भाजप ठाकरेंचे हिंदुत्वविरोधी राजकारण संघ, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आमच्या प्रचाराचे एक लक्ष्य उद्धव ठाकरेंचे हिंदुत्वविरोधी राजकारण उघडे करणे हेही असेल. कालपर्यत ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदूविरोधक पक्षांशी युती करून हिंदुत्व सोडले. तेव्हापासून ते उघड उघड मुस्लिम अनुनय करत आहेत. लोकसभेत मुस्लिमांनी ठरवून उद्धवसेनेला त्याचमुळे मतदान केले. मुस्लिमांमध्ये मतदानाचा फतवा निघतो. हिंदूंनी त्याचा एकत्रित मुकाबला करावा, असा संदेश पोहोचवणे सुरू झाले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article