नगरसूल येथील मतदान केंद्राच्या बाहेर छगन भुजबळ व माणिकराव शिंदे यांची भेट झाली.
Published on
:
20 Nov 2024, 10:28 am
Updated on
:
20 Nov 2024, 10:28 am
पुढारी ऑनलाइन डेस्क; येवला विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ व महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्यात थेट लढत होत आहे. मराठा आरक्षणाला छगन भुजबळ यांनी विरोध केल्याने याठिकाणी शरद पवारांनी माणिकराव शिंदे यांच्यारुपाने मराठा कार्ड या मतदारसंघात चालवले आहे.
त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष असणार आहे.
दरम्यान आज मतदानाच्या दिवशी छगन भुजबळांनी मतदारसंघातील नगरसूल येथील मतदार केंद्राला भेट दिली. येथे माणिकराव शिंदे व छगन भुजबळ दोघेही आमने-सामने आले. यावेळी दोघांमध्ये संवादही झाली. दोघांनी एकमेकांना शुभेच्छा देत विचारपूस केली. राजकीय वर्तुळात या भेटीची चांगलीच चर्चा रंगली.