ईव्हीएम घेऊन गेलेल्या बसमध्ये सापडले 86 हजार 500 रुपये:प्रामाणिकपणा दाखवत विद्यार्थ्यांनी केले वाहकाकडे सुपूर्द
3 hours ago
1
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. ईव्हीएम घेऊन गेलेल्या एका बसच्या शिटाखाली गुरुवारी सायंकाळी ५०० रुपयांच्या नोटांचे दोन बंडल विद्यार्थ्यांना दिसून आले. विद्यार्थ्यांनी ते नोटांचे बंडल वाहक सविता मनोज आडांगळे यांच्याकडे सुपूर्द केले. प्रशासनाने निवडणूक कामासाठी वापरलेल्या बसमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मोठी रक्कम मिळून आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. कोपरगाव आगाराची बस एमएच ४० वाय ५६७९ या क्रमांकाची बस स्ट्रॉंगरूम पासून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन मतदान केंद्रापर्यंत जाऊन आली. त्यानंतर त्याच बसने गुरुवारी वैजापूर कोपरगाव बस फेऱ्या केल्या. गुरुवारी सायंकाळी संजीवनी इंग्लिश स्कूल येथून विद्यार्थ्यांना घेऊन बस धामोरीच्या दिशेने जात असताना बसच्या शेवटच्या सिटाखाली प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपयांच्या नोटांचे दोन बंडल मिळून आले.साईराज कदम या विद्यार्थ्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी बसमधील संजीवनी मीडियम कर्मचारी रोहित होन आणि सचिन भालके यांच्याकडे दिली. त्यांनी ते नोटांचे बंडल महिला वाहक सविता अडांगळे यांच्याकडे दिली. सविता अडांगळे यांनी आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांनाही माहिती देऊन ती रक्कम आगारात नेऊन मोजून जमा केली. ती रक्कम ८६ हजार ५०० रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)