जपूया आपला सन्मान...१०० टक्के करुया मतदान:गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोस्टकार्ड पाठवून पालकांना केले मतदानाचे आवाहन
3 days ago
1
"मतदानाचे कर्तव्य बजावून, महाराष्ट्राला एक उत्तम राज्य बनवूया, १००% टक्के मतदान करूया...जपूया आपला सन्मान...१०० टक्के करुया मतदान, हमारा गौरव , हमारी शान, शतप्रतिशत करे मतदान, असा संदेश असलेली आकर्षक पोस्टकार्ड राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पालक, जिल्हा परिषद अहिल्यानगर, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर आणि जिल्हा व सत्र न्यायालय, अहिल्यानगर येथील अधिकारी कर्मचारी यांना पाठवली. त्यात बुधवारी,२० नोव्हेंबर होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालिमठ, स्वीप समितीचे नोडल अधिकारी शिक्षणाधिकारी माध्यमिक अशोक कडूस, शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. "मतदानाचे कर्तव्य बजावून, महाराष्ट्राला एक उत्तम राज्य बनवूया, १००% टक्के मतदान करूया...!, हमारा गौरव , हमारी शान, शतप्रतिशत करे मतदान, असे आवाहन करणाऱ्या संदेशा सोबतच अहिल्यानगर स्वीप कक्षाच्या लोकशाहीच्या शिल्पकार उपक्रमाला अनुसरून "मतदानाची करूया ७५% पार, होऊया लोकशाहीचे शिल्पकार , मतदान तुमचा हक्कच नाही तर जबाबदारी आहे .. असे ही संदेश पाठवले आहेत. नुकतीच साजरी केलेली दिवाळी लक्षात घेता , " दिवाळी केली दणक्यात साजरी, आता आहे मतदानाची बारी .....! " सारखे सूचक संदेश ही यात आहे, असे मुख्याध्यापक संदीप शेळके म्हणाले. गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीसाठी पालकासह अधिकाऱ्यांना पोस्ट कार्ड पाठवून मतदान करण्याचे आवाहन केले. सर्व कामे बाजूला ठेवून मतदान करा शुभेच्छा आणि सोबत इतकी आकर्षक विद्यार्थ्यांनी रंगवलेली पोस्टकार्ड ही या उपक्रमाचे वैशिष्ट म्हणता येईल. ज्यांना ज्यांना हे पोस्टकार्ड विद्यार्थ्यांनी पाठवले आहे, ते नक्कीच हे कार्ड आपल्या संग्रही ठेवतील यात शंका नाही. विद्यार्थ्यांच्या या कलात्मक आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी आपण सर्वांनी सर्व कामे बाजूला ठेवून नक्की मतदान करूया आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करूया, असे असे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम म्हणाले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)