जायकवाडीतून "रब्बी'साठी यंदा एक, उन्हाळी पिकांसाठी 3 आवर्तने अधिक:यंदा रब्बीसाठी तीन, तर उन्हाळी पिकांना चार पाणी पाळ्या
2 hours ago
1
जायकवाडी धरणातून रब्बी पिकांसाठी तीन पाणी पाळ्या व उन्हाळी पिकांसाठी चार पाणी पाळ्या देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेत रब्बी पीकांसाठी एक तर उन्हाळी पीकांसाठी तीन आवर्तने अधिक देण्यात येणार आहे. रब्बी हंगामाच्या पाणी पाळीस मंगळवारी सुरुवात होईल असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले. यामुळे मराठवाड्यातील १ लाख ४१ हजार ६४० हेक्टरवरील सिंचन क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सध्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा शंभर टक्के आहे. रब्बी हंगामासाठी धरणातून सिंचनासाठी प्रथम सिंचन पाणी पाळीसाठी मंगळवारी पैठण डाव्या कालव्यामध्ये २०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. मराठवाड्यातील शेतीला यंदा दोन्ही कालव्यातून रब्बीसाठी तीन, तर उन्हाळी पिकासाठी चार पाणी पाळ्या देण्यात येणार आहेत. या पाण्याचा फायदा छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व हजार हेक्टरवरील पिकांना होईल असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले. जायकवाडीवरील डावा व उजवा कालव्याची दयनीय अवस्था झाली आहे. डाव्या कालव्यातून २०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. या पाण्याचा फायदा परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील शेतीला होणार असून या पाण्यावर ऊस, गहू, ज्वारीचे पीक अधिक लागवड होणार आहे. पैठण डाव्या कालव्यावरून १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर तर उजव्या कालव्यातून ४१ हजार ६८२ हेक्टर असे एकूण १ लाख ८३ हजार ३२२ हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली येते. यंदा जायकवाडीतून रब्बीसाठी तीन उन्हाळी पिकासाठी चार पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन झाले असल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले. ^विहिरींना मुबलक पाणी येणार जायकवाडीतून सोडलेल्या पाण्यामुळे कालव्यालगतच्या विहिरींना मुबलक पाणी असणार आहे. एक पाणी पाळी साधारणपणे २१ दिवसांची असते. खरीपमधील पिकाला परतीच्या पावसाने मारले होते, आता रब्बीवर आस आहे. पाणी सोडण्यात येणार असल्याचे मराठवाड्यात रब्बीचे पीक दमदार येईल. - विकास पाटील, तालुका कृषी अधिकारी जायकवाडीचा डावा कालवा २०८ किमी लांबीचा आहे. यावर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर जमीन ओलिताखाली येते. तर उजवा कालवा १३२ किमी लांबीचा त्यावर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड या तीन जिल्ह्यांतील ४६ हजार ६४० हेक्टर जमीन ओलिताखाली येते. यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात येत असल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला. कालव्यांची अवस्था पाहता दरवर्षी लाखोंचा खर्च करूनदेखील सोडलेले पाणी पूर्ण क्षमतेने सिंचनाला मिळत नाही. दोन्ही कालव्यावर पाच जिल्ह्यांतील एकूण १८३ हजार ३२२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ज्वारी, गहू अधिक सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता लवकरच मार्गी कालव्यांचा या जिल्ह्यांना फायदा
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)