जिल्ह्यातील 15 हजार शेतकऱ्यांना 37.40 कोटींची नुकसान भरपाई:ई-पंचनामा पाेर्टलवर याद्या अपलोडचे काम सुरु‎

2 hours ago 2
एप्रिल आणि मे महिन्यात सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. मे महिन्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाकडूनच निधी आला नव्हता. त्यामुळे भरपाई रखडली होती. तब्बल ३ महिन्यानंतर शुक्रवारी राज्य सरकारने त्यासंबंधीचे शासन परिपत्रक प्रसिध्द केले असून, १५ हजार ४५१ शेतकऱ्यांना ३७ कोटी ४० लाख ७३ हजार रुपयांची भरपाई मिळणार आहे. मे महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. त्यात १५ हजार ४५१ शेतकऱ्यांच्या १० हजार ४४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला सादर केला होता. ती महिन्यानंतर राज्य सरकारने भरपाईसाठीचा निधी मंजूर केला आहे. त्या विषयीचे शासन निर्णय प्रसिध्द झाल्यानंतर तालुका स्तरावरुन आता बाधित शेतकऱ्यांच्या तालुकानिहाय याद्या ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड केल्या जाणार आहेत. तातडीने त्या याद्या अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांकडून आधार प्रमाणिकरण करुन घेण्यात येईल, आपले सरकार सेवा केंद्रांवर आधार प्रमाणीकरणाची सोय असणार आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. तालुके शेतकरी भरपाई उत्तर सोलापूर 3 91,800 बार्शी 10 1,94,400 दक्षिण सोलापूर 59 1378800 अपर मंद्रुप 4 64800 अक्कलकोट 0 0 माढा 3940 94561200 करमाळा 4746 148474800 पंढरपूर 2748 26037960 मोहोळ 1248 33639840 मंगळवेढा 291 6063300 सांगोला 238 4443660 माळशिरस 2164 59122440 एकूण 15451 374073000

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article