जिल्ह्यातील पाणवठ्यांवर विदेशी पक्ष्यांची मांदियाळी:हजारो किलोमीटरचा प्रवास करत अमरावतीत पोहोचले अनेक विदेशी पक्षी
2 hours ago
1
पर्यावरण संतुलनात पक्ष्यांचे स्थलांतरण हे महत्त्वाचे असते. हिवाळ्यात विदेशातील पक्षी येथील अनेक पानवठ्यांवर आलेली दिसतात. जवळपास ६० ते ७० प्रजातींमधील नवे पक्षी हिवाळ्यात तलाव, नद्यांच्या परिसरात असल्याने पक्षी मित्रांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या शहर, जिल्ह्यातील पाणवठ्यांवर कॉमन पोचार्ड, कॉकटेल पोचार्ड , विविध प्रजातींचे बदकं, हंस, व्हाईट स्टार्क, ग्रेटर स्कुप, , मलार्ड , लांब पाय असणारा चिखलपक्षी असे पानपक्षी, रानपक्षी दिसत आहेत. शहरालगतच्या वडाळी, छत्री तलावात बदकांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात, असे पक्षी निरीक्षक यादव तरटे यांनी सांगितले. आपल्या परिसरात युरोप, मध्य आशिया, मंगोलिया, युरेशिया येथून हे पक्षी आले आहेत. यापैकी वाईट स्टार्क हे युरोपमधून आलेत. तर मलार्ड हे पक्षी रशिया, कजाकिस्तान, मंगोलिया, सायबेरिया या देशांमधून आलेत. ग्रेटर स्कूप हा पक्षीही रशिया, कझाकिस्तान मधून आला . निसर्ग चक्रामध्ये पक्षी हे महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतात नोव्हेंबर, डिसेंबर जानेवारीत विदेशातील पक्षी अन्न शोधण्यासाठी स्थलांतर करून येतात. अनेक काळांपासून या पक्ष्यांना नेमके कुठे मुक्कामी जायचे, हे माहीत असते आपल्याला हवे असणार मुबलक अन्न राहण्यासाठी योग्य वातावरण असलेल्या भागात पक्षी पोहोचतात, जिल्ह्यात पाणवठ्याच्या परिसरात सुमारे ६० ते ७० प्रजातींचे विदेशी पक्षी वास्तव्याला येतात. नोव्हेंबर, डिसेंबर ,जानेवारी फेब्रुवारी, मार्चच्या मध्यापर्यंत या पक्ष्यांचा मुक्काम पाणवठ्यांवर असतो. मार्च महिन्यात आपल्या भागात उन्हाळा सुरू होताच हे सर्व विदेशी पक्षी पुन्हा एकदा आपल्या मायदेशी परततात. ही सर्व नैसर्गिक प्रक्रिया आहे, अशी पक्षी स्थलांतारणाबाबतची माहिती पक्षी निरीक्षकांनी दिली. पक्षी मित्रांमध्ये आनंद नेमका पक्षी कोणता, कुठून आला आणि त्याची काय वैशिष्ट्ये आहेत, याची अचूक माहिती घेणं पक्षी मित्रांसाठी आनंदाची बाब मानली जाते. सध्या विदेशातून आलेल्या पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी महत्त्वाचा काळ मानला जातो. अमरावती शहरालगत वडाळी तलाव, फुटका तलाव, छत्री तलाव यासह मालखेड तलाव या परिसरात मोठी दुर्बीण आणि कॅमेरा घेऊन पक्षी मित्र दिवस उजाडताच फिरताना दिसतात. मेळघाटच्या जंगलात असणारे पाणवठेही पक्षी निरीक्षणासाठी शांत आणि योग्य ठिकाण मानले जाते. सुटीच्या दिवशी तर लहान मुलांना घेऊन अनेक पक्षी मित्र जंगल परिसरात असणाऱ्या पाणवठ्यालगत अगदी ठिय्या मांडून बसलेले दिसतात.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)