येत्या 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी जुहू कोळीवाड्यात कोळी सी फूड फेस्टिव्हल आयोजित केला आहे. सांताक्रुझ पश्चिम येथील सुनील दत्त उद्यान येथे होणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये कोळी समाजाची संस्कृती, परंपरा, खाद्य पद्धती आणि जेवणाची लज्जत अनुभवायला मिळणार आहे.
जुहू चौपाटी आणि खार दांडा कोळीवाड्याच्या मध्यभागी असलेल्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष आहे, अशी माहिती जुहू कोळीवाडा सी फूड फेस्टिव्हलचे अध्यक्ष वसंत थोटी व उपाध्यक्ष अरविंद साने यांनी दिली. मासळीच्या विविध जाती, निरनिराळ्या पारंपरिक खाद्यदार्थांचे प्रदर्शन आणि विक्री, कोळी नृत्य व परंपरा आदींचे दर्शनही या दोन दिवसांच्या महोत्सवात होणार असल्याची माहिती सचिव विज्ञय दैले आणि खजिनदार जनार्दन थोटी यांनी दिली.