सुनीता विल्यम्स यांचा नवा फोटो नासाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.(Image source- X)
Published on
:
17 Nov 2024, 10:48 am
Updated on
:
17 Nov 2024, 10:48 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकन अवकाश संशोधन संस्था 'नासा'च्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स ( Sunita Williams )आणि त्यांचे साथीदार विल्मोर बुच हे अनेक महिन्यांपासून अंतराळात 'अडकले' आहेत. नुकतेच सुनीता विल्यम्स यांचा एका फोटो समोर आला होता. या फोटो त्यांची प्रकृती खालावल्याचे दिसत होते. त्यांच्या वजनात कमालीची घट झाल्याचे दिसत होते. या संपूर्ण जगासाठी मोठा धक्का होता. मात्र आता अंतराळातून एक चांगली बातमी समोर आली आहे. सुनीता विल्यम्स यांचा नवा फोटो नासाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा निरोगी दिसत आहे.
... तेव्हा तिचा चेहरा पृथ्वीवरुन येणार्या प्रकाशाने चमकतो
नासाचा नवीन फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये सुनीता विल्यम्स या SpaceX ड्रॅगन क्रू स्पेसक्राफ्टच्या खिडकीतून बाहेर पाहताना दिसत आहेत. "NASA अंतराळवीर सनी विल्यम्स तिच्या Expedition 72 स्वेटरमध्ये SpaceX ड्रॅगन क्रू स्पेसक्राफ्टच्या गोल खिडकीतून बाहेर पहात आहेत. जेव्हा ती पृथ्वीकडे पाहते तेव्हा तिचा चेहरा पृथ्वीवरून येणाऱ्या प्रकाशाने चमकतो, असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे.
सुनीता विल्यम्स पूर्णपणे निरोगी
फोटोमध्ये सुनीता विल्यम्स यांचा चेहरा एकाबाजूला दिसत आहे. यामध्ये त्या पूर्णपणे निरोगी दिसत आहे. नासाच्या या फोटोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच 21 हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. याशिवाय अनेक लोक कमेंट करून प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने विचारले आहे की, त्या केव्हा परत येणार आहेत. यासाठी कोणतेही मिशन नियोजित आहे का? तर एकाने म्हटलं आहे की, सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर सुरक्षित परतावे अशी माझी इच्छा आहे.
पूर्वीच्या फोटोने माजली होती खळबळ
काही दिवसांपूर्वी सुनीता विल्यम्स याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. यामध्ये त्यांचे वजन कमालीचे घटलेले दिसले होते. यावरुन सर्वांनीच चिंता व्यक्त केली होती. नासाच्या स्त्रोतांनी न्यूयॉर्क पोस्टला सांगितले होते की," सुनीता विल्यम्स यांचे सध्याचे छायाचित्र पाहून त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंतेचे वातावण निर्माण झाले आहे. त्यांचे वजन कमालीचे घटले आहे. त्यामुळे त्यांचे वजन पुर्वपदावर आणणे हे नासाचे प्राधान्य आहे". सुनीता विल्यम्स यांनीही आपली प्रकृती उत्तम असून, दैनंदिनीचे तपशीलवार वर्णन केले होते.
जूनच्या पहिल्या आठवड्यापासून आहेत अंतराळात
नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स हे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्यासह जूनच्या पहिल्या आठवड्यात आठ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले आहेत. परंतु बोईंग स्टारलाइन्समध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विल्यम्स आणि बुचर यांना १५० दिवसांपेक्षा जास्त काळ तेथे राहावे लागले आहे. दरम्यान, नासाने दोन्ही अंतराळवीर पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पृथ्वीवर परत येऊ शकतील, अशी शक्यता वर्तवली आहे.
प्रकृतीसाठी अंतराळवीरांना करावा लागतो व्यायाम
बोईंग स्टारलाइन्स प्रक्षेपणावेळी सुनीता विल्यम्स यांचे वजन सुमारे 140 पौंड होते. अंतराळ जीवनातील उच्च भौतिक गरजा संतुलित करण्यासाठी आवश्यक असलेल्या 3,500 ते 4,000 कॅलरीजचे दररोज सेवन पूर्ण करण्यासाठी अंतराळवीर धडपडत आहे. नासाच्या कर्मचाऱ्याने स्पष्ट केले. वजनहीन वातावरणात स्नायू आणि हाडांचे वस्तुमान टिकवून ठेवण्यासाठी दररोज दोन तासांपेक्षा जास्त व्यायाम करावा लागतो, ज्यामुळे अतिरिक्त कॅलरी बर्न होतात, असेही नासाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.