प्रातिनिधिक छायाचित्र.File Photo
Published on
:
17 Nov 2024, 1:23 pm
Updated on
:
17 Nov 2024, 1:23 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्त्रायलने मध्य बेरूतमध्ये केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रवक्ता मोहम्मद अफिफ ठार झाल्याचे वृत्त 'अल जजिरा'ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. ( Israeli strike in central Beirut)
इस्त्रायलने आज (दि.१७) सीरियन बाथ पार्टीच्या लेबनीज शाखेला लक्ष्य केले. हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रवक्ता मोहम्मद अफिफसह अन्य तीन जण ठार झाले आहेत. या हल्ल्याचा फटका बेरूतच्या दक्षिणी उपनगरातून विस्थापित झालेले परिसरातलाही बसला आहे. अफिफ हा हिजबुल्लाचा मुख्य प्रवक्ता होता. इराण-समर्थित गटाच्या मीडिया संबंध कार्यालयाचा ताबा घेण्यापूर्वी त्याने हिजबुल्लाहचे अल-मनार टेलिव्हिजनवर अनेक वर्षे काम केले होते.