सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेवर 3-1 ने टी 20I मालिका जिंकल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना आता बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे वेध लागले आहेत. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई वरिष्ठ निवड समितीने या स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत श्रेयस अय्यर हा मुंबईच कर्णधारपद सांभाळणार आहे. अजिंक्य रहाणे मुंबईचं नेतृत्व करतो. मात्र त्याला बाजुला करुन श्रेयसला कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे रहाणेची उचलबांगडी केली आहे की त्याला काही वेळ त्या जबाबदारीतून विश्रांती देण्यात आलीय? हे निश्चित नाही. तर दुसऱ्या बाजूला संघात सलामीवीर पृथ्वी शॉ याचं पुनरागम झालं आहे. पृथ्वीला रणजी ट्रॉफी स्पर्धेतून फिटनेस आणि शिस्तभंगामुळे बाहेर करण्यात आलं होतं.
मुंबई संघात श्रेयस, पृथ्वी आणि अजिंक्य रहाणे यांच्याव्यतिरिक्त ऑलराउंडर शार्दूल ठाकुर याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच तनुष कोटीयन याचीही निवड करण्यात आली आहे. तुनष नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया एकडून खेळला होता.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेला 23 नोव्हेंबपासून सुरुवात होणार आहे. मुंबईचा या स्पर्धेत ई ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुंबई साखळी फेरीत एकूण 6 सामने खेळणार आहे. आपण मुंबईच्या या सामन्यांचं वेळापत्रक जाणून घेऊयात.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबई टीम जाहीर
A power-packed squad led by skipper Shreyas Iyer is acceptable to conquer the 𝐒𝐲𝐞𝐝 𝐌𝐮𝐬𝐡𝐭𝐚𝐪 𝐀𝐥𝐢 𝐓𝐫𝐨𝐩𝐡𝐲!💪#MCA #Mumbai #Cricket #Wankhede #BCCI pic.twitter.com/0M7Jqys9ia
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) November 17, 2024
मुंबईचं या स्पर्धेतील वेळापत्रक
मुंबई विरुद्ध गोवा, शनिवार 23 नोव्हेंबर
मुंबई विरुद्ध महाराष्ट्र, बुधवार 27 नोव्हेंबर
मुंबई विरुद्ध केरळ, शुक्रवार 29 नोव्हेंबर
मुंबई विरुद्ध नागालँड, रविवार 1 डिसेंबर
मुंबई विरुद्ध सर्व्हिसेस, मंगळवार 3 डिसेंबर
मुंबई विरुद्ध आंध्रा, गुरुवार, 5 डिसेंबर
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024-2025 साठी मुंबई टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अंगकृष रघुवंशी, जय बिस्टा, अजिंक्य रहाणे, सिद्धेश लाड, सूर्यांश शेंडगे, साईराज पाटील, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), आकाश आनंद (विकेटकीपर), शम्स मुलानी, हिमांशु सिंह, तनुष कोटीयन, शार्दूल ठाकुर, मोहित अवस्थी, रोयस्टन डायस आणि जुनेद खान