Published on
:
17 Nov 2024, 4:46 pm
Updated on
:
17 Nov 2024, 4:46 pm
कळमनुरी : एका स्विफ्ट डिझायर मध्ये देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती कळमनुरी पोलिसांना मिळाली.यानंतर सापळा रचून दि.१६ नोव्हेंबर रोजी रात्री ११:४५ च्या सुमारास कळमनुरी हिंगोली रस्त्यावर एका धाब्याजवळ ही गाडी रस्त्यालगत पोलिसांनी पकडली. या वाहनांमध्ये ठेवलेले 33 हजाराच्या देशी दारूच्या बॉटल व पाच लाखाचे एक वाहन असा एकुण पाच लाख 33 हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सध्या विधानसभा निवडणूकीचे प्रचार शेवटच्या टप्प्यात आले असून यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून पेट्रोलिंग सुरू केली आहे.पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती पोलीसांना मिळाली की,स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये दारूची वाहतूक होत आहे. ही स्विफ्ट डिझायर थांबवली असता पोलीस दिसताच स्विफ्ट डिझायर गाडी सोडून चालक पळून गेला. गाडी तपासली असता त्यामध्ये १० दारूचे बॉक्स आढळून आले. त्यामध्ये ४८० सीलबंद बॉटल होत्या.
ही कारवाई करताना पोलीस उपाधीक्षक भुसारे , पोलीस निरीक्षक मोहन भोसले, पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे,पोहेक पोले, सोपान सांगळे, कैलास सातव, संजय राठोड,बलखंडे, पोलीस स्टेशनचे कर्मचारी हजर होते. ३३,६००रुपयाची दारु व ५ लाख रुपया ची स्विफ्ट डिझायर गाडी असा एकूण ५,३३,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस कर्मचारी गजानन सांगळे यांच्या फिर्यादीवरून कैलास टाले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार माधव भडके करीत आहे.