कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात मतदान करताना दिव्यांग मतदार.Pudhari Photo
Published on
:
17 Nov 2024, 5:24 pm
Updated on
:
17 Nov 2024, 5:24 pm
कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या गृह मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ९६.५२ टक्के गृह मतदान झाले आहे. यामध्ये दिव्यांग मतदारांनी १०० टक्के मतदान करत आपला लोकशाही वरील विश्वास बळकट असल्याचे सिद्ध केले आहे. दिव्यांग व्यक्तींकडे विशेष अशी ताकद असते, काही विशेष गुणही असतात. लोकशाहीच्या बळीकटीकरणातील त्यांचे योगदान महत्वाचे आहे.
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात नुकतेच गृह मतदान घेण्यात आले. मतदारसंघात १५ नोव्हेंबरला गृह मतदानाला सुरुवात करण्यात आली होती. कुडाळ मालवण मतदारसंघात गृह मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या ६३४ एवढी होती. यापैकी या मतदारसंघात ६१२ लोकांनी गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. तर या मतदारसंघात ६० दिव्यांग मतदार होते. या ६० पैकी ६० मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात दिव्यांग मतदारांचे मतदान १०० टक्के झाले आहे. हे मतदार दिव्यांग असले तरी त्यांची लोकशाही वर असलेली आढळ श्रद्धा व ठाम विश्वास या माध्यमातून दिसून आला. ही बाब कौतुकास्पद असून यातून इतर मतदारांनीही आदर्श घेऊन जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने या निमित्ताने करण्यात आले आहे.