पाकिस्तान क्रिकेट टीम मोहम्मद रिझवान यान नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पाकिस्तानने रिझवानच्या कॅप्टन्सीत अप्रतिम सरुवात केली. पाकिस्तानने कांगारुंवर 22 वर्षांनंतर त्यांच्याच घरात एकदिवसीय मालिका जिंकण्याची कामगिरी केली. मात्र त्यानंतर टी 20I मालिकेत त्यांची दुर्दशा झाली. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या टी 20I सीरिजमध्ये सलग 2 सामने जिंकत मालिकेवर नाव कोरलं. ऑस्ट्रेलिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना जिंकून विजयी हॅटट्रिकसह पाकिस्तानला क्लिन स्वीप करण्याची दुहेरी संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानसमोर शेवटचा सामना जिंकून क्लिन स्वीप टाळण्याचं आव्हान असणार आहे. आता तिसऱ्या सामन्यात कांगारु विजयी हॅटट्रिक करतं की पाकिस्तान तसं करण्यापासून रोखतं? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलिया टीम : मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, जोश इंग्लिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन, ॲडम झाम्पा, जोश फिलिप आणि शॉन ॲबॉट.
पाकिस्तान टीम: मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), बाबर आझम, साहिबजादा फरहान, उस्मान खान, आगा सलमान, इरफान खान, अब्बास आफ्रिदी, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, सुफियान मुकीम, हारिस रौफ, हसीबुल्ला खान, अराफत मिन्हास, जहाँदाद खान आणि ओमेर युसूफ.