हिंगोली (Adv. Prakash Ambedkar) : विधानसभा निवडणूक निमित्ताने मागील काही दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हिंगोलीत आले असता त्यांच्या हेलीकॅप्टरची तपासणी निवडणूक आयोगाच्या पथकाने केली होती. १७ नोव्हेंबर रोजी वंबआचे अॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) हिंगोलीत आले असता, त्यांच्याही हेलीकॅप्टरची तपासणी निवडणूक आयोगाच्या पथकाने केली.
विधानसभा निवडणूक निमित्ताने आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्या निमित्त प्रचार दौर्या दरम्यान उमेदवाराच्या प्रचारार्थ अनेक नेते मंडळी येत आहेत. मध्यंतरी विदर्भात उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हेलीकॅप्टरची तपासणी केल्यानंतर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. मध्यंतरी महायुती उमेदवाराच्या निवडणूक प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हेलीकॅप्टरमधील सामानाची तपासणी निवडणूक आयोगाच्या पथकाने केली होती. त्या पाठोपाठ आता १७ नोव्हेंबरला वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) हे हिंगोलीत आले असता हेलीपॅडवर त्यांच्याही हेलीकॅप्टरची निवडणूक आयोगाच्या पथकाने पाहणी केली.