रामटेक (Ashish Jaiswal) : उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) साहेबांना काँग्रेस सोबत घरठाव करु नका व हिंदुत्वासोबत फारकत घेवू नका, अशी विनवणी आम्ही केली होती. परंतु उध्दव साहेबांनी काँग्रेस सोबत जाण्याचा अवसान घातकीपणा केला. यामुळे आम्ही चाळीस आमदार हिंदुत्वासाठी बाहेर पडलो वभाजप सोबत आलो. हिंदुत्व हा विचार व जीवन पध्दती आहे. त्यामुळे हिंदुत्वासोबत तडजोड शक्य नसल्याचे मत महायुतीचे उमेदवार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी व्यक्त केले.
आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांना सध्या रामटेक विधान सभा निवडणूकीत जातीय धृवीकरण होत आहे का? व एका विशिष्ट धर्माचे लोक एका विशिष्ट उमेदवाराच्या समर्थनार्थ एकवल्याचे आपणास वाटते का? असा प्रश्न विचारला असता जयस्वाल (Ashish Jaiswal) म्हणाले की, तशा चर्चा फार मोठ्या प्रमाणात माझ्या कानी येत आहे. मी सात निवडणूका लढलो परंतु कधीही जातीयवादाचा घाणेरडा प्रकार केला नाही. मी सर्व धर्म समभावाचा पुरस्कर्ता आहे परंतु देव,देश आणि धर्म हे देखील मी अग्रस्थानी मानतो.
हिंदुत्व ही शिवसेनेची ओळख आहे. मी कट्टर शिवसैनिक आहे त्यामुळे हिंदुत्व हा माझा रक्तगट असल्याचे जयस्वाल (Ashish Jaiswal) म्हणाले. जाती जाती विखुरलेला हिंदू समाज हिंदू म्हणून एकञित आला तर त्याला कुणीच हरवू शकत नाही. परंतु सध्या एकूणच परिस्थिती पाहू जाता ‘बटेंगे तो,कटेंगे’ व ‘एक है तो सेफ है’ हे समजून घेणे किती आवश्यक आहे, याची प्रचिती येते असे प्रतिपादन जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी केले.
ते (Ashish Jaiswal) पुढे बोलताना म्हणाले की, रामटेकचे राममंदीर ही रामटेक ओळख आहे.रामटेकला विदर्भाची काशी म्हणतात. हिंदुंची ही आस्था जपली जावी म्हणून राममंदीर परिसर विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला. मंदीरावर कायम स्वरुपी विद्युत सुशोभीकरण केले. अंबाळा परिसराचे देखील विद्युत सुशोभीकरण केले.या परिसरात येणार्या भाविकांसाठी देखणे रस्ते केले. अयोध्येत रामललांच्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळी रामटेकमध्ये देखील भव्य श्रीराम महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले. मोठ्या कलावंतांनी येथे हजेरी लावली होती.
सिंधुरागिरी महानाट्यातून राम मंदीराचा धार्मिक पौराणिक इतिहास, भिमालपेन महानाट्यातून जाज्वल्य आदीवासी संस्कृती लोकांपुढे मांडली. कालिदास महोत्सवांच्या देखण्या आयोजनांतून संस्कृतींचे दर्शन घडविले. या सगळ्या बाबी रामटेक विषयी राज्यात व देशात रामटेककरांची मान उंचावणार्या होत्या. रामटेकच्या जनतेने गेली पंचेवीस तीस वर्ष प्रेमात एवढे न्हावू घातले की कधी जातीयता डोक्यात आलीच नाही. आता माञ येथे काहींनी सुरु केलेले प्रयोग येथील सलोख्याचा तानाबाणा विस्कटवेल याचे दुःख होते अशी उद्विणता जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी व्यक्त केली.