रोहयोतून वर्षभर रोजगार नाहीच
भिवंडी, ठाणे, कल्याण, पालघर, मुंब्रा या ठिकाणी, गवत कापणे, बिल्डिंग बांधकाम, रेतीबंदर या कामांसाठी तर बीड, उस्मानाबाद अशा लांबच्या जिल्ह्यातही येथील मजूरांचे स्थलांतर होते. मिळेल ते काम करण्यासाठी नाका कामगार म्हणूनही स्थलांतरित होत आहेत. हे करीत असताना बऱ्याचवेळा या आदिवासी मजुरांवर अन्याय सुद्धा होत असतो. जॉबकार्ड धारक रोहयो मजूरांना ग्रामपंचायत स्तर, पंचायत समिती, सार्वजनिक तसेच जि. प. बांधकाम विभाग, तालुका कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, पाणलोट क्षेत्र, वनीकरण, अशा महात्मा गांधी रोजगार हमी योजतुन रोजगार देणाऱ्या यंत्रणा आहेत. मात्र तरीही मजुराला रोजगार हमीवर वर्षभर काम मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे.