ठाकरे गटात इनकमिंग सुरु, महायुतीला मिळणार डबल धक्का, कोकणातील मोठा नेता करणार पक्षप्रवेश

1 hour ago 1

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वत्र राजकीय घडामोडी वेगाने सुरु झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आता इनकमिंग आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. सध्या महायुतीतून अनेक नेते, पदाधिकारी हे महाविकासाआघाडीत प्रवेश करत आहेत. तर दुसरीकडे महाविकासाघाडीतही हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आज शिवसेना उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मोठी इनकमिंग पाहायला मिळणार आहे. कोकणातील भाजपचा एक मोठा नेता ठाकरे गटाच्या गळाला लागला आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडलेला एक नेता अनेक वर्षांनी पुन्हा स्वगृही परतणार आहे.

कोकणातील भाजप नेते आणि माजी आमदार राजन तेली हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडलेले दीपक आबा साळुंखे हे देखील आज स्वगृही ठाकरे गटात परतत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मातोश्रीवर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. संध्याकाळी 4 च्या दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राजन तेली यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोललं जात आहे.

काही दिवसांपूर्वी राजन तेली यांनी भाजपच्या राजन तेली यांनी प्राथमिक सदस्यत्व आणि पदाचा राजीनामा दिला होता. यानतंर त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना राजीनामा देण्याची धक्कादायक कारणं सांगितली होती. माझ्या मतदारसंघात सध्या घराणेशाही सुरु आहे आणि ती घराणेशाही मला मान्य नाही. तसेच राणे परिवाराकडून होत असलेले अंतर्गत खच्चीकरण यालाही मी कंटाळलो आहे. त्यामुळेच मी राजीनामा देत आहे, असे राजन तेली यांनी म्हटले आहे.

राजन तेली हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे कोकणातील भाजपचा मोठा नेता ठाकरे गटाच्या गळाला लागल्याचे बोललं जात आहे. कोकणातील भाजपचे नेते राजन तेली हे उद्या मातोश्रीवर ठाकरे गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. दुपारी चारच्या सुमारास हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article