अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील अनेक खात्यातील प्रमुखांच्या नावांची घोषणा करत आहे. अशातच ट्रम्प कॅबिनेटच्या नामनिर्देशित व्यक्ती आणि नियुक्त केलेल्या लोकांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या मिळाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. याबाबत अधिक तपास केला जात आहे.
नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रवक्त्याने बुधवारी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेने या धमक्यांविरुद्ध कारवाई केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या सरकारमध्ये महत्त्वपूर्ण पदांसाठी निवड केलेल्या नामनिर्देशित व्यक्तिंना बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. बायडेन प्रशासनाने ट्रम्प प्रशाससनाला सत्ता हस्तांतरणाची प्रक्रियेची देखरेख करणाऱ्या ट्राजिशन टिमच्या प्रवक्त्याने राष्ट्रपती निवडणुतकीतील अनेक नामनिर्देशित आणि नवनिर्वाचित लोकांना बॉम्बने उडविण्याची धमकी दिल्याच्या बातमीला दुजोरा दिला.
एका अधिकृत निवेदनात, डोनाल्ड ट्रम्प यांची ट्राजिशन टीमच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, काल रात्री आणि आज सकाळी राष्ट्रपती ट्रम्पच्या अनेक कॅबिनेट अनेक नामांकित व्यक्तींना आणि प्रशासनाद्वारा नियुक्त केलेल्या लोकांना आणि त्यांच्या सोबत राहणाऱ्या लोकांना हिंसक आणि जीवघेण्या धमक्या देण्यात आल्या. धमकी देण्यात आलेल्या लोकांमध्ये न्यूयॉर्क प्रतिनिधी एलिस स्टेफनिक आहे, ज्यांना ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये पुढील राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. ॲटर्नी जनरलसाठी ट्रम्पची सुरुवातीची निवड मॅट गेट्ज, कामगार विभागाचे नेतृत्व करण्यासाठी निवडलेले ओरेगॉनचे प्रतिनिधी लोरी चावेझ-डेरेमर आणि न्यूयॉर्कचे माजी काँग्रेस सदस्य ली झेल्डिन, ज्यांना पर्यावरण संरक्षण एजन्सीचे प्रमुख म्हणून नाव देण्यात आले होते धमक्याही मिळाल्या.
A pipe bomb threat targeting me and my family at our home today was sent in with a pro-Palestinian themed message. My family and I were not home at the time and are safe. We are working with law enforcement to learn more as this situation develops. We are thankful for the swift…
— Lee Zeldin (@leezeldin) November 27, 2024
यामध्ये एलिस स्टेफनिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या न्यूयॉर्क निवासाला बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आली होती. माजी काँग्रेस सदस्य ली जेल्डिन यांनीही धमकी दिलेल्या मेसेजची तक्रार केली आहे. आज माझ्या घरी मला आणि माझ्या कुटुंबावर निशाणा साधून पाइप बॉम्बने हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याचे त्यांनी म्हंटले आहे. त्यामध्ये फिलिस्तानी समर्थक असा संदेश होता. त्यावेळी मी आणि माझे कुटुंब घरी नव्हतो. आम्ही सुरक्षित असल्याचे एक्सच्या माध्यमातून कळवले.