सर्वांच्या राशींची ताकद आणि कमजोरी जाणून घ्या, कधीच फसवणूक होणार नाही

2 hours ago 2

या लेखात आपण प्रत्येक राशीच्या लोकांच्या स्वभावाचा अभ्यास करणार आहोत. प्रत्येक राशीचे जमेचे आणि कमकुवत गुण स्पष्ट केले आहेत. तुमच्या राशीनुसार तुमचे गुण-दोष ओळखून तुम्ही तुमच्या आयुष्यात अधिक चांगले निर्णय घेऊ शकता आणि लोकांच्या फसवणुकीपासून वाचू शकता. लग्न आणि राशीचा प्रभाव तसेच ग्रहांच्या स्थितीचा प्रभाव या लेखात स्पष्ट केला आहे.

सर्वांच्या राशींची ताकद आणि कमजोरी जाणून घ्या, कधीच फसवणूक होणार नाही

| Updated on: Nov 28, 2024 | 1:44 PM

प्रत्येक राशीचा एक स्वभाव असतो. त्या राशीच्या लोकांची एक सवय असते. काही राशींच्या लोकांकडे चांगले गुण असतात तर काही राशींच्या लोकांकडे दुर्गुण असतात. हे गुण-दुर्गुण कळले तर? तर कुणाचीच कधी फसवणूक होणार नाही. पण ते कुणालाच कळत नसतात आणि त्यामुळे लोकांची फसवणूक होत असते. पण थोडा बारकाईने अभ्यास केल्यास प्रत्येक राशीच्या लोकांचा स्वभाव कळू शकतो. कोणत्या राशीचे लोक कोणत्या स्वभावाचे असतात हे समजू शकतं. फक्त त्यासाठी थोडा प्रयत्न केला पाहिजे. थोडे कष्ट घेतले तर हा स्वभाव समजून येऊ शकतो. आणि त्यामुळे एकदा का लोकांचा स्वभाव कळला तर होणारी फसवणूक टाळता येऊ शकते. आज आपण हाच अभ्यास करणार आहोत.

मेष राशी –

  • जमेची बाजू – साहसी, आत्मविश्वासी, पराक्रमी, निर्भिड, उद्योगी, भावूक आणि ऊर्जावान.
  • कमकुवत बाजू – मूडी, इर्ष्याळू, आक्रमक, आवेगी आणि चपळ

वृषभ राशी –

  • जमेची बाजू- विश्वासू, कुटनीतीज्ज्ञ, सहिष्णू, धैर्यवान, व्यावहारिक
  • कमकुवत बाजू – जिद्दी, तोंडाळ, हट्टी, कडक स्वभावाचा

मिथुन राशी –

  • जमेची बाजू- हाजर जबाबी, पटकन शिकणारा, जिज्ञासू, मैत्रीपूर्ण, दिलखुलास, कुटनितीज्ज्ञ
  • कमकुवत बाजू – आवेगी, अनिर्णायक आणि अव्यवस्थित

कर्क राशी –

  • जमेची बाजू – संवेदनशील, भावनात्मक, प्रामाणिक, अत्यंत कल्पनाशक्ती असलेला, सहज, सरळ आणि प्रेरणादायी
  • कमकुवत बाजू – मूडी, ध्यास घेणारा, संशयी, असुरक्षित, चिडचिडा

सिंह राशी –

  • जमेची बाजू – वैभवसंपन्न, शालीन, दिलदार, भावूक, प्रसन्नचित्त
  • कमकुवत बाजू – आळसी, अहंकारी, असहिष्णू, जिद्दी

कन्या राशी –

  • जमेची बाजू – विश्लेषणात्मक, व्यावहारिक, पूर्णतावादी, व्यवस्थित, आरोग्याबाबत सजग, निसर्ग प्रेमी
  • कमकुवत बाजू – टीकाकार, मूडी आणि संकुचित दृष्टीचा

तुळ राशी –

  • जमेची बाजू – साहसी, बुद्धिमान, विनोदी, खरा मित्र, प्रभावशाली व्यक्तीमत्त्व
  • कमकुवत बाजू – इर्ष्याळू, द्वेषी, अहंकारी आणि क्रोधी

धनु राशी –

  • जमेची बाजू – प्रामाणिक, उदार, आदर्शवादी, धार्मिक
  • कमकुवत बाजू – अधीर, अधिकचं आश्वासन देणारा, असंगत

मकर राशी –

  • जमेची बाजू – मेहनशीत, शिस्तप्रिय, यथार्थवादी, समर्पित, महत्त्वकांक्षी
  • कमकुवत बाजू – निराशावादी, लालची, निंदा करणारा, निर्दयी, भयभीत

कुंभ राशी –

  • जमेची बाजू – मानवतावादी, सहानुभूती असलेला, प्रगतिशील, मौलिक, दयाळू, संशोधक
  • कमकुवत बाजू – उपेक्षित, उड्डाणटप्पू, सनकी, अपरंपरागत

मीन राशी –

  • जमेची बाजू – बुद्धिमान, ज्ञानपिपासू, कलात्मक, रचनात्मक, दयाळू, क्षमाशील
  • कमकुवत बाजू – पलायनवादी, भयभीत, निरागस, भोगी

ज्या लोकांची लग्न आणि राशी एक असते त्यांच्याबाबतचं निदान अचूक वर्तवलं जातं. लग्न आणि राशी वेगवेगळी असेल तर त्यातील जे शक्तीशाली असते त्यानुसारच व्यक्तीची जमेची बाजू आणि कमकुवत बाजू ठरते. लग्नासह लग्नेश, राशीसोबत स्वामी तसेच अन्य ग्रहांच्या जन्मकुंडलीच्या स्थितीत फलादेश परिवर्तन करतो. अर्थात अचूक फलकथन करायचे असेल तर नऊ ग्रहांचे एकसाथ विश्लेषण केले पाहिजे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article