बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी:खंडणी उकळणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल

3 hours ago 2
एका तरुणावर बलात्काराचा खोटा गु्न्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून चार लाख ६४ हजार रुपयांची खंडणी घेणाऱ्या आरोपी तरुणी विरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नयना सतीश कुंटे (रा. लाइफ निर्वाणा सिटी, धानोरी,पुणे) असे आरोपी तरुणीचे नाव आहे. याबाबत एका तरुणाने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात आरोपी तरुणी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नयना कुंटे आणि तक्रारदार तरुणाची जानेवारी महिन्यात एका मध्यस्थ मार्फत ओळख झाली. तरुण धानोरी भागात राहण्यासाठी असून सदर दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर कुंटेने त्याला जाणीवपूर्वक धमकाविण्यास सुरुवात केली. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करते आणि तुला गुन्ह्यात अडकवते, अशी धमकी देऊन त्याच्याकडून वेळोवेळी चार लाख ६४ हजार रुपये घेतले. तरुण, तसेच त्याच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देखील आरोपी तरुणीने दिली. कुंटेच्या त्रासामुळे तरुणाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस सुडगे पुढील तपास करत आहेत. दिवसाला १०० रूपयांची खंडणी उकळणार्‍याला बेड्या दुकान चालविण्यासाठी चालकाकडून ऑनलाईनसह रोकड स्वरूपात खंडणी उकळणार्‍याला चंदननगर पोलिसांनी अटक केली.ही घटना जून २०२३ ते जून २०२४ कालावधीत वडगावशेरीतील इनवोरबीट मॉलजवळ घडली आहे. जीवन गोविंद बनसोडे (वय २७ रा. खराडी,पुणे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तरूणाने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी परिसरात तक्रारदाराचे किरकोळ साहित्य विक्रीचे दुकान आहे. जून २०२३ ते जून २०२४ कालावधीत बनसोडेने त्याच्या दुकानात जाउन संबंधिताला धमकावून खंडणी वसूल केली. दरदिवशी १०० रूपये प्रमाणे खंडणी उकळली होती. त्यानंतर त्याने दरदिवशी २०० रूपयांची मागणी केल्याप्रकरणी तक्रारदाराने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्याला अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत माने तपास करीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article