Published on
:
28 Nov 2024, 1:37 pm
Updated on
:
28 Nov 2024, 1:37 pm
वाशिम : स्त्री भ्रूणहत्या रोखण्याकरीता व गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र कायदा १९९४ सुधारित २००३ च्या कडक अमंलबजावणी करिता जिल्ह्यात काटेकोरपणे अमंलबजावणी होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने आज २८ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा सल्लागार समितीच्या अध्यक्षा डॉ. अल्का मकासरे यांच्या उपस्थितीत व प्र.जिल्हा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अविनाश झरे यांच्या मार्गदर्शनाखाली सभा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्याकरीता जिल्ह्यातील प्रत्येक प्रसुतिगृहामध्ये जन्माला येणा-या कन्यारत्न जन्माचे विविध प्रकारे स्वागत झालेच पाहिजे. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रमाची तसेच पिसीपीएनडीटी टोल फ्री क्रमांक याची मोठया प्रमाणाति जनजागृती करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या.
जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी सोनोग्राफी केंद्र व गर्भपात केंद्रावर कडक निगरानी ठेवण्याचे आदेश दिले. प्रसुतीपूर्व निदान तंत्राचा वापर करुन गर्भलिंग निदान व गर्भपात करणे हे शिक्षेस पात्र आहे. परंतु त्यानंतरही दृष्टीआड गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणा-यावर कायद्येशिर कार्यवाही करावी. तसेच बेकायदेशीर गर्भलिंग निदानाची व गर्भपाताची माहिती देण्याऱ्यास १ लाख रुपये बक्षिस देण्यात येणार आहे.
समाजात अजुनही स्त्री भ्रूणहत्येच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी होत आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्याकरीता शासनाने राज्यस्तरावर टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ४४७५ तसेच १०४, व जिल्हास्तरावर टोल फ्री क्रमांक ८४५९८१४०६० दिला आहे. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. अविनाश झरे यांनी केले आहे. सदर सभेला डॉ. अल्का मकासरे, डॉ.जे.एस. बाहेती, डॉ. गोपाल हेंबाडे, श्री राजेश गोरुले, डॉ. जयश्री मस्के, डॉ. निता कचरडे तसेच पिसीपीएनडीटी विधी समुपदेशक ऍड.राधा नरवलीया यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.