Published on
:
28 Nov 2024, 3:11 pm
Updated on
:
28 Nov 2024, 3:11 pm
यवतमाळ : नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर किन्ही जवादे फाट्याजवळ दुचाकी आणि कंटेनरच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२८) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. देविदास लक्ष्मण उरकुडे (वय ५०) आणि देविदास केशव मडावी (वय ५५, दोघेही रा. उखुर्डा जि. चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, नागपूरकडून हैद्राबादकडे कंटेनर (एमपी- ०४- ई- ४२२० ) जात असताना दुचाकी (क्रं. एमएच- ३२ आर- २८९५) हे पाढरकंवडाकडून वडकीकडे येत असताना दोन्ही वाहनांची किन्ही जवादे फाट्याजवळ समोरासमोर धडक झाली. धडक एवढी भीषण होती की, या अपघातात दुचाकीस्वार देविदास उरकुडेसह देविदास मडावी याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वडकी ठाणेदार सुखदेव भोरखडे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास वडकी पोलिस करत आहे.