महायुतीचे नेतेPuddhari File Photo
Published on
:
28 Nov 2024, 5:28 pm
Updated on
:
28 Nov 2024, 5:28 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क :
महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सध्या दिल्लीत आहे. महायुतीचे नेते सध्या दिल्लीत असून बैठकांचे सत्र सुरु आहे. शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार व भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे सर्व नेते दिल्ली येथे दाखल झाले असून. नुकतीच राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या घरी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली. तर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या खासदारांबरोबर बैठक घेतली आहे.
आता या तिन्ही नेत्यांची देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांच्या निवास्थानी बैठक सुरु असून या बैठकीनंतरच निर्णय अपेक्षित आहे. यामुळे सर्वांचे लक्ष हे दिल्लीकडे लागून राहिले आहे. या पूर्वीच्या घडामोडी पाहता मुख्यमंत्री हा भाजपाचा असणार हे निश्चित झाले आहे. आता केवळ नाव जाहीर होणे बाकी आहे. आता अपेक्षेप्रमाणे आघाडीवर असलेले देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर होणार की भाजप धक्कातंत्राचा वापर करते हे पाहणे रोचक ठरणार आहे.