म्हातारपणात त्वचेत होणारे बदल वाढत्या वयाबरोबर सामान्य असतात. जसजसे आपण मोठे होतो, तसतसे त्वचेची चमक, लवचिकता कमी होऊ लागते. हे बदल हळूहळू घडतात, परंतु तरीही ते आपल्या त्वचेवर परिणाम करतात. असं का घडतं, यामध्ये नेमकं काय आहे कारण, याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…
कोलेजन आणि इलास्टिनची कमतरता
त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी कोलेजन आणि इलास्टिन ही दोन महत्त्वाची प्रोटीन्स आहेत. वृद्धापकाळात त्यांचे प्रमाण कमी होऊ लागते. कोलेजन त्वचेला मजबूत बनवते आणि इलास्टिन ती लवचिक ठेवते. या दोन प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे त्वचा पातळ आणि सैल होते.
हार्मोनल बदल
जसजसे वय वाढत जाते तसतसे आपल्या शरीरात हार्मोनल बदल होतात. स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर, इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होऊ लागते, जी त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असते. त्यामुळे त्वचेमध्ये ओलावा कमी होऊन ती पातळ आणि सुरकुत्या पडते. पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनची पातळी देखील वयाबरोबर कमी होते, ज्यामुळे त्वचेवर परिणाम होतो.
त्वचेतील ओलावा कमी होणे
जसजसे वय वाढते तसतसे त्वचेतील आर्द्रता कमी होऊ लागते. आपल्या त्वचेतील तेल निर्माण करणाऱ्या ग्रंथी कमकुवत होतात, ज्यामुळे त्वचा कोरडी पडू लागते. जेव्हा त्वचेमध्ये ओलावा कमी होतो, तेव्हा ती पातळ होते आणि सुरकुत्या दिसू लागतात.