सीरियातील बंडखोर गटांनी लष्करी तळावर ताबा मिळवल्याचे वृत्त आहे. या गटांनी बुधवारी केलेल्या हल्ल्यात 89 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 4 वर्षांत बंडखोरांनी केलेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान हल्ला करणाऱया गटांपैकी एक हयात तहरीर अल- शाम याला अल कायदाचा पाठिंबा असल्याचे समोर आले आहे.
सीरियातील सर्वात मोठय़ा शहरांपैकी एक असलेल्या अलेप्पोमध्ये या दहशतवादी संघटनांनी 9.5 किलोमीटरपर्यंत आत घुसखोरी केली. बशर अल असद सरकारला पाठिंबा देणाऱया सैन्याची शस्त्रs आणि वाहने त्यांच्या सैनिकांनी ताब्यात घेतली असून त्यांनी सीरियन सरकारच्या 46 लष्करी तळांवर कब्जा केल्याचा दावा टेलिग्रामवरून केला आहे.
10 तासांत अनेक गावे ताब्यात
बंडखोरांनी अवघ्या 10 तासांत अलेप्पो शहरातील अनेक गावे ताब्यात घेण्यात यश मिळवले, परंतु या दाव्यांवर सीरियन सरकारने काहीही सांगितले नाही. 2020 मध्ये तुकाaच्या मदतीने, बंडखोर आणि असाद सरकारमध्ये एक करार झाला. त्यामुळे तेथे मोठे हल्ले कमी झाले.