Published on
:
28 Nov 2024, 11:36 pm
Updated on
:
28 Nov 2024, 11:36 pm
न्यूयॉर्क : कोरड्या आणि पडीक दिसणार्या मंगळाच्या पटलावर कधी काळी निश्चितच पाणी अस्तित्वात होते, असे स्पष्ट संकेत एका संशोधनातून मिळालेले आहेत. मंगळावर कधी काळी तरी सजीवसृष्टीला अनुरूप वातावरण होते, असा याचा अर्थ आहे. यापूर्वी 2011 मध्ये सहारा वाळवंटात मंगळावरील एक उल्कापिंड एनडब्ल्यूए 034 कोसळल्याचे आढळून आले होते. त्यानंतर त्याच्या या अभ्यासात अनेक बाबी आढळून आल्या. मंगळावरील पाण्याचे अस्तित्व हीदेखील त्यापैकीच एक बाब मानली जाते.
सहारा वाळवंटात कोसळलेल्या उल्कापिंडाचा विस्तृत अभ्यास केला असता, संशोधकांना त्यात 4.45 अब्ज वर्षे जुना जरिकॉन कण सापडला होता. यामध्ये पाण्याने भरलेल्या पदार्थाचे अंश आढळून आले होते. ज्यावेळी नॅनो स्कूल जियोकेमिस्ट्रीच्या मदतीने या कणाचा अभ्यास करण्यात आला, त्यानंतर त्याच्या रासायनिक रचनेचा उलगडा झाला. या कणात लोह, अॅल्युमिनियम, इट्रियम व सोडियमचे अंश समाविष्ट होते, असे अहवालातून अधोरेखित झाले. या अभ्यासात असेही आढळून आले की, मंगळ ग्रहावर कधी काळी गरम पाणीदेखील होते, जे प्रारंभिक टप्प्यात सजीवसृष्टीला अनुकूल वातावरणासाठी आवश्यक तत्त्वही असते.