दक्षिणेत चक्रीवादळ, उत्तरेत शीतलहरी
देशाच्या हवामानात शुक्रवारी दोन परस्पर विरोधी वातावरण तयार होत आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात तयार होत आहे. तर बंगालच्या उपसागरात फेंगल नावाचे चक्रीवादळ तयार होत असल्याने दक्षिण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तरेतून शीतलहरी, तर दक्षिणेतून बाष्पयुक्त वारे राज्यात येत असल्याने कडाक्याची थंडी अन् दाट धुके असे वातावरण तयार होणार आहे. असे वातावरण 1 डिसेंबरपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
गुरुवारचे राज्याचे किमान तापमान : पुणे (एनडीए : 8.7, शिवाजीनगर : 9.8), अहिल्यानगर : 9.5, नाशिक : 10.5, जळगाव : 11.2, महाबळेश्वर : 11.5, छ.संभाजीनगर : 11.6, परभणी : 11.5, नागपूर : 11.8, सातारा : 12.5, अकोला : 12.8, गोंदिया : 11.4, कोल्हापूर : 15.1, मालेगाव : 12.6, सांगली : 14.9, सोलापूर : 14.6, धाराशिव : 12.4, मुंबई : 22.2, अमरावती : 14.9, बुलडाणा : 13.3, ब—ह्मपुरी : 11, चंद्रपूर : 14, गोंदिया : 11.4, वर्धा : 12.4.