सिल्लोड तालुक्यात पशुगणनेस सोमवारपासून सुरुवात:प्रत्यक्ष कामाला होणार पुढील आठवड्यात सुरुवात

2 hours ago 1
राज्य सरकारच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २१ वी पशुगणना २५ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राबवण्यात येत आहे. त्यासाठी सिल्लोड तालुका पशुसंवर्धन विभागाची तयारी पूर्ण झाली असून पशुसंवर्धन विभाग दर पाच वर्षांनी होणाऱ्या पशुगणनेस सज्ज असून एकूण ७० हजार ६२ कुटुंबे संख्यासाठी २४ प्रगणक व ७ पर्यवेक्षक यांची तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागासाठी नेमणूक केली आहे. ग्रामीण भागातील ३ हजार कुटुंबे संख्यामागे एक प्रगणक व शहरीसाठी ४ हजार कुटुंब संख्यामागे एक प्रगणक अशी नेमणूक करण्यात आली आहे. पशुगणना शासनाने विकसित केलेल्या ॲपद्वारे करण्यात येणार आहे. सर्व प्रगणक व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. पशुपालकांनी आपल्या सर्व जनावरांच्या कानात बिल्ले मारून घ्यावेत. आपण खरेदी-विक्री केलेल्या, ज्या जनावरांच्या कानात बिल्ले आहेत त्यांची माहितीही, जन्म व मृत्यू झालेल्या जनावरांच्या नोंदी इत्यादी माहिती आपले गाव ज्या पशुवैद्यकीय दवाखान्यास जोडले आहे तेथे भेट देऊन एनडीएलएम या संकेतस्थळावर नियमित अद्ययावत करून घ्यावी. ॲपद्वारे होणाऱ्या प्राण्यांच्या वर्गवारी न्यायकांना मोबाइलमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या ॲपमध्ये प्राण्यांची वर्गवारी न्याय माहिती भरली जाणार आहे. यात प्राण्यांची वर्गवारी जात या संदर्भातील छायाचित्रांसह माहिती ॲपमध्ये असणार आहे. शेळी, मेंढी, गाय, म्हशी, अश्व, वराह यासह पाळीव कुत्र्यांची माहितीही नोंदवली जाणार आहे. यासाठी पशुगणना अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुढील आठवड्यात शासनाच्या सूचनेनुसार पशुगणनेस प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. संभाजीनगर जिल्हा कोड- ४६९ {सिल्लोड तालुका (उप-जिल्हा) कोड- ४१३५ {५९०८९ ग्रामीण कुटुंब संख्या. {१०९७३ शहरी कुटुंब संख्या. ग्रामीणसाठी २१ प्रगणक व ६ पर्यवेक्षक {शहरीसाठी ३ प्रगणक व १ पर्यवेक्षक पशुसंवर्धन विभागाच्या सेवा देण्यास मदत ^या पशुगणनामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी, अश्व व वराह आदी प्राण्यांची गणना केली जाणार आहे. पशुपालकांनी आपल्या जनावरांची अचूक, योग्य व खरी माहिती प्रगणकास द्यावी. जेणेकरून विभागास जनावरांची उत्पादकता वाढवणे, साथरोग नियंत्रण करणे, सेवा पुरवण्यास मदत होईल . -डॉ. विनोद चव्हाण, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article