शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार - आमदार बोरनारे:बाजार समितीत शेतकऱ्यांची भेट घेत प्रश्न सोडवण्याचे दिले आश्वासन‎

2 hours ago 1
वैजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या घायगाव शिवारातील कांदा मार्केटमधील जय बालाजी ट्रेडिंग कंपनीचा मालक व कांदा व्यापारी सागर राजपूत याने तालुक्यातील जवळपास चारशे शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करुन त्यांना दोन कोटी रुपये न देता फसवणुक केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले.या प्रकरणात पोलिसांनी सागर राजपूत यास सोलापूर येथुन अटक करुन तपास सुरु केला आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला नसल्याने त्यांनी बाजार समितीला पाच डिसेंबरपर्यतचे अल्टिमेटम देऊन उपोषण कर्तृत्वाचा इशारा दिला होता.‌ त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वैजापुरचे आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी गुरुवारी हस्तक्षेप केला.‌ त्यांनी बाजार समितीच्या आवारात जमलेल्या व फसवणुक झालेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव यांच्यासह संचालक संजय पाटील निकम, प्रशांत पाटील सदाफळ, प्रशांत त्रिभुवन, ज्ञानेश्वर जगताप, कल्याण जगताप, मधुकर पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार बोरनारे यांनी शेतकऱ्यांचे पैसे चुकते करण्यासाठी बाजार समितीने ठोस पावले उचलण्याचा सल्ला दिला.‌ व्यापारी सागर राजपूत याच्याकडुन वसुल करण्यात आलेली रक्कमेतुन शेतकऱ्यांचे चुकारे होत नसल्यास बाजार समितीने उर्वरित रकमेबाबत ठराव घेऊन शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे पैसे द्यावेत असे निर्देश यावेळी आमदारांनी दिले.‌बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील निकम यांनीही व्यापाऱ्यांना परवाना देणे तसेच मार्केट फी वसुलीबाबत कडक धोरण अवलंबण्याचू सुतोवाच केले.‌ दरम्यान, शेतकऱ्यांना पैसे देण्याबाबत शनिवारी (३० नोव्हेंबर) बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा होऊन ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमदारांनी सकारात्मक भुमीका घेऊन बाजार समितीला निर्देश दिल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार प्रा. रमेश बोरनारे कर्मचाऱ्यांवर संतापले व्यापाऱ्यांच्या मार्केट फीबाबत विचारणा केली असता कुणीही कर्मचारी प्रतिसाद देण्यास तयार नसल्याने आमदार रमेश बोरनारे त्यांच्यावर चांगलेच संतापले.‌ ‘मला पाच मिनिटांत अशा व्यापाऱ्यांची यादी द्या' असे आमदारांनी सांगितले. त्यामुळे बाजार समितीचे सचिव प्रल्हाद मोटे, सह सचिव संदिप निकम, चंचल मते यांची चांगलीच भंबेरी उडाली.‌ तुमच्यामुळेच हे शेतकरी बाजार समितीसमोर जमा झाले आहेत असे बोरनारे कर्मचाऱ्यांना उद्देशुन म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article