साताऱ्यात लिव्ह इन पार्टनरची हत्या, नंतर हरवल्याची तक्रार:खंबाटकी घाटातील घटना, मृत महिला पुण्याची रहिवासी

2 hours ago 2
पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील दरीत मृतदेह आढळलेल्या महिलेची तिच्याच लिव्ह इन पार्टनरने डोक्यात हातोड्याचे घाव करून हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. महिलेचा मृतदेह खंबाटकी घाटात आणून टाकल्यानंतर दोन दिवसांनी संशयितानेच ती हरवल्याची तक्रार दिली होती. जयश्री विनय मोरे (रा. मारुंजी, ता. मुळशी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. दिनेश पोपट ठोंबरे असे आरोपीचे नाव आहे. खंबाटकी घाटात बंद पडलेल्या मालट्रकच्या दुरुस्तीसाठी मेकॅनिकला बोलावून चालक दरीच्या कडेला उभा असताना त्याला दरीत एका महिलेचा मृतदेह दिसला. त्याने खंडाळा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शिरवळ रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह दरीतून वर काढला. मृत महिलेचे वय अंदाजे २७ वर्षे होते. डोक्यात लोखंडी वस्तूने पाच-सहा घाव घालण्यात आल्याचे आढळल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तींची माहिती घेतली असता वाकडमधून महिला बेपत्ता असल्याचे समजले. त्या बेपत्ता महिलेले वर्णन मृत महिलेशी जुळले. जयश्री मोरे ही चार वर्षांपासून संशयित दिनेश ठोंबरे याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. त्याला सोडून ती आई- वडिलांसोबत राहायला जाणार होती. त्यामुळे तो चिडून होता. २४ नोव्हेंबर रोजी रात्री त्याने तिला बोलावून घेतले. कारमधून तिला बाहेर घेऊन गेला. कारमध्येच त्याने हातोड्याचे घाव घालून तिची हत्या केली. त्यानंतर घाटात तिचा मृतदेह फेकून दिला. आरोपीने मृत महिलेच्या तीन वर्षीय मुलास आळंदीत सोडले मृत महिलेच्या ३ वर्षांच्या मुलाला संशयिताने आळंदीत बेवारस स्थितीत सोडून दिले. सुदैवाने पोलिसांनी त्याच्या आजोबांचा पत्ता शोधून काढला. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. मुलाला आजोबांच्या ताब्यात दिले. ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयिताला कळली. त्यानंतर मंगळवारी संशयित दिनेश ठोंबरे याने वाकड पोलिसांत जयश्री मोरे हरवल्याची तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी त्याची चौकशी केली असता आरोपीने खुनाची कबुली दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article