शुक्लपक्षात २ डिसेंबरच्या मुहूर्तावरच हाेणार नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी:रविवारी सकाळी दर्श अमावास्या संपत असल्याने 2 रोजीचा मुहूर्त

1 hour ago 2
कार्तिक कृ. १४, शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी सुरू होणारी दर्श अमावास्या रविवार, १ डिसेंबर रोजी सकाळी ११.५१ वाजता संपत आहे तर सोमवार, २ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिना प्रारंभ होत असून शुक्लपक्षाचा पहिला दिवस आहे. तसेच देव दीपावली आहे. म्हणून सोमवार, २ डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. अमावास्या आणि पौर्णिमा यामधील पहिल्या पंधरवड्याला गौरा पक्ष किंवा शुक्लपक्ष म्हणजेच “पांढरी/चमकदार/सोनेरी बाजू’, तेजस्वी चंद्राचा काळ (वॅक्सिंग मून) आणि दुसरा पंधरवडा म्हणतात, तर दुसऱ्या पंधरवड्यास वद्यपक्ष किंवा कृष्णपक्ष अर्थात काळी बाजू, लुप्त होणाऱ्या चंद्राचा काळ (अस्त होणारा चंद्र) असे म्हणतात. शुक्लपक्ष हा १५ दिवसांचा कालावधी अमावास्येनंतर सुरू होतो आणि पौर्णिमा (पौर्णिमेच्या) दिवशी समाप्त होतो आणि शुभ मानला जातो. म्हणून साधारणत: मोठी किंवा काही नैमित्तिक कामे शुक्लपक्षात केली जातात अशी माहिती ख्यातनाम ज्योतीर्विद राजंदेकर पंचांगकर्त्या विद्या राजंदेकर यांनी दिली. कृष्णपक्षातील चतुर्दशी आणि अमावास्येला शुभ कामे केली जात नाहीत. चतुर्दशीला रिक्ता तिथी असते. तर अमावास्येला चंद्रबळ नसते. चंद्र निर्बलीय असतो. शुक्लपक्षात चंद्र कलाकलाने वाढत पुढे जातो. त्यामुळे त्याचे महत्त्व असल्याचे राजंदेकर यांनी सांगितले. शिंदेसेनेने भाजप केंद्रीय नेतृत्वाकडे मागितली ही खाती एकनाथ शिंदे यांनी तडजोड करून पाहिली. पण, केंद्रीय नेतृत्व ठाम व खमके राहिले. त्यातही नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), राज्य उत्पादन शुल्क, सहकार, महसूल, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, उच्च व तंत्र शिक्षण ही खाती एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article