Published on
:
28 Nov 2024, 11:40 pm
Updated on
:
28 Nov 2024, 11:40 pm
वॉशिंग्टन : यूट्यूबने लोक कसे पैसे कमावतात किंवा एका व्हिडीओमागे या लोकांना किती आणि कसे पैसे मिळतात, हा प्रश्न तर प्रत्येकाच्याच मनात असतो. इन्फ्लूएन्सर किंवा डिजिटल माध्यमातून लोक पैसे कमावत असल्याचे आपण बर्याचदा ऐकतोही. पण, हे लोक कसे पैसे कमावतात किंवा एका व्हिडीओ मागे या लोकांना किती आणि कसे पैसे मिळतात, याची मात्र क्वचितच कल्पना असते.
या युट्यूबरना कसे पैसे मिळतात, त्याचे उदाहरण अशाच एका इन्फ्यूअन्सरच्या माध्यमातून घेता येईल. या यूट्यूबरचे नाव मिस्टर बीस्ट आहे आणि त्याचे खरे नाव जेम्स स्टीफन डोनाल्डसन आहे. त्याच्या यूट्यूब चॅनेलवर 296 मिलियन म्हणजेच सुमारे 27 कोटी सबस्क्रायबर आहेत. या सबस्क्रायबरच्या मदतीने, या यूट्यूबरच्या यूट्यूब चॅनेलला दररोज लाखो व्ह्यूज मिळतात. मिस्टर बीस्टने 2012 मध्ये त्यांचे यूट्यूब चॅनल सुरू केले आणि त्यांच्या चॅनेलमध्ये त्यांच्या टीममध्ये 250 पेक्षा जास्त लोकांची टीम आहे. एवढा मोठा यूट्यूबर असल्यामुळे जेम्स स्टीफनकडे करोडो रुपयांचे चॅनल आहे. यूट्यूब चॅनेलवरील व्ह्यूज हा या प्लॅटफॉर्मचा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत असतो. यासोबतच प्रायोजकत्व, मर्चेंडाईज आणि यूट्यूब प्रीमियमद्वारे कमाई करता येते.
यूट्यूबर्सच्या कमाईबद्दल निश्चितपणे सांगणे खूप कठीण आहे; पण त्यांच्या चॅनेलच्या व्ह्यूजवरून त्याचे गणित मांडता येते. असे गृहीत धरू की यूट्यूबच्या अपलोड केलेल्या व्हिडीओंना एका दिवसात 10 दशलक्ष व्ह्यूज मिळत असेल, तर यूट्यूब त्यांना प्रति 1000 व्ह्यूजवर 3 डॉलर देते, तर यानुसार, त्यांना फक्त यूट्यूबवरून 30 हजार डॉलर्स म्हणजे 2,533,902.16 रुपये मिळतात. या व्यतिरिक्त, यूट्यूब प्रीमियम, प्रायोजकत्व आणि मर्चेंडाईजमधून कमाई करता येणे शक्य असते.