नादुरुस्त आयशरला धडकून परभणीत 2 दुचाकीस्वार ठार:पाथरीजवळ दोन दिवसांत दोन गंभीर अपघात
2 hours ago
2
शॉर्टसर्किटमुळे केबिनला आग लागल्यामुळे आयशर ट्रक पाथरी शहराजवळील महामार्ग क्रमांक६१वर दोन दिवसांपासून उभा होता.या ट्रकवर मागून दुचाकीस्वार आदळल्याच्या दोन घटना घडल्या. दोन्ही घटनांमध्ये दोन दुचाकीस्वारठार झाले. पाथरी तालुक्यात मागील काही दिवसांत अपघाताच्या घटना घडत आहेत. मंगळवारी व बुधवारी रात्रीझालेल्या अपघातांमध्ये दोनदुचाकीस्वारांचा मृत्यू झाला.मंगळवारी (२६ नोव्हेंबर) पाथरीतालुक्यातील महामार्ग ६१वर सारोळाशिवारात आयशर (डीएल १ जी.ई०९३५) वाहनाच्या केबिनमध्येशॉर्टसर्किट झाले. त्यामुळे ट्रकच्याकेबिनला आग लागली. त्यानंतरआयशरचालक वाहन महामार्गावरचसोडून पसार झाला. २६ रोजी दुपारीएमएच २४ एसी ७१०५ यादुचाकीवरून जात असलेलेइसराईल शहानूर बेग (३८, रा.पुपळी, ता. वडवणी, जि. बीड) हेआयशरवर धडकून गंभीर जखमीझाले. त्यांना उपचारासाठी परभणीलापाठवण्यात आले. बुधवारी (२७नोव्हेंबर) दुपारी त्यांचाउपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरीघटना बुधवारी (२७ नोव्हेंबर)घडली. पाथरी तालुक्यातील हदगावयेथील सुरेश शिंदे (२७) हा युवकदुचाकीने हदगावकडे जात होता.रात्रीच्या अंधारात तो आयशरवरमागून आदळला. यात त्याचा जागीचमृत्यू झाला. याप्रकरणी पाथरीपोलिसात गुन्हा दाखल झाला. ट्रॉलीला रिफ्लेक्टर हवे पाथरी तालुक्यात महामार्गाच्या दुतर्फाकाटेरी झुडपे वाढल्याने अपघाताचाधोका वाढला आहे. सध्या ऊसगाळप हंगाम सुरू असून उसाच्याट्रॉल्या रस्त्यावर उभ्या केल्या जातआहेत. यापैकी अनेक वाहनांनारिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघात होऊशकतो. त्यामुळे प्रशासनानेउपाययोजना करणे आवश्यक आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)