मुरगूड : कागल तालुक्यातील सुरुपलीच्या श्रीकृष्ण सहकारी दुध संस्थेत सन २००२ ते २०२२ या कालावधीत तत्कालीन सचिव व संचालकांकडून ४ लाख ३९ हजार ९३९ रुपये रकमेचा अपहार झाल्याचे लेखापरीक्षणावेळी आढळून आल्याने सचिवासह २९ जणाविरुद्ध मुरगूड पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे . यातील सचिव व पाच संचालकांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
यासंबधी अधिक माहिती अशी, सुरुपली येथील श्रीकृष्ण सहकारी दुध संस्थेमध्ये सन २००२ ते २०२२ या काळात तत्कालीन सचिव व संचालकांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून संस्थेच्या ४ लाख ३९ हजार ९३९ रुपये रक्कमेचा गैरविनियोग करून संस्थेच्या ठेवी अधिकृत बँकेत न ठेवता या रक्कमेचा गैरविनियोग करून अपहार केल्याचे सहकारी संस्था लेखापरीक्षक सदाशिव हिंदुराव तिबीले यांच्या लेखापरीक्षणात आढळून आले आहे. त्यानुसार लेखापरीक्षकांनी मुरगूड पोलीसात अपहाराची तक्रार मुरगूड पोलीसात दिली आहे . या प्रकरणी तत्कालीन सचिव विलास दिनकर पाटील यांच्यासह २९ संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यामध्ये सचिव विलास दिनकर पाटील, रंगराव नादवडेकर, विश्वास पाटील, अनिल कांबळे, पंडीत कुंभार, कृष्णात पाटील या सहा जणांचा समावेश आहे. त्यांना अटक करण्यात आली असून दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
विलास डाफळे, शंकर पाटील , रामचंद्र पाटील, नितीन बाईत , अनिता पाटील , सविता पाटील, दिनकर कुंभार , तुकाराम पाटील , मारुती नादवडेकर, गणपती पाटील, सखुबाई पाटील, शितल नादवडेकर, पांडुरंग चंद्रापा मोरे ,शिवाजी नादवडेकर ,तुकाराम घाटगे , हौसाबाई पाटील ,गणपती पाटील (सर्व रा. सुरुपली ) यांचा या अपहार प्रकरणात समावेश आहे. तत्कालीन संचालकातील सहा संचालक मयत आहेत.या प्रकरणाने सहकारी संस्थांतील अपहाराचा नमुना चव्हाट्यावर आल्याने त्याची चर्चा होत आहे.
याप्रकरणी इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्याचे संकेत सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी दिले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रियांका वाकळे व पोलीस हवालदार एस .एम . चव्हाण करीत आहेत.