परवाना धारक बंदुक विक्रीच्या दुकानातून कामगारांनीच तब्बल 30 बोअर आणि पिस्तुलाची 20 काडतुसे चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर त्यांच्या मुसक्या गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. याप्रकरणी दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने बेड्या ठोकल्या आहेत. अदित्य चंदन मॅकनोर (22) आणि सुमित राजु कांबळे (28, कॅम्प पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत अज्ञान फिरोज बंदुकवाला (रा. भोअरी आळी, रविवार पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी यांचे रविवारी पेठेतील भोअरी आळीमध्ये परवानाधारक पिस्तुल आणि बंदुक विक्रीचे दुकान आहेत. येथून बंदुकीसाठी लागणार्या बोअरची आणि पिस्तुलासाठी लागणार्या काडतुसाची देखील विक्री होते. याच दुकानात आदित्य मॅकनोर नावाचा मुलगा कामाला होता. त्याने जलद पैसे कमविण्यासाठी दुकानातून तब्बल 32 बोअर आणि 20 काडतुसे चोरी केली. याप्रकरणी हा प्रकार दुकान मालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अदित्य हा त्याचा मित्र सुमित कांबळे याच्या मदतीने काडतुसे विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची व ती विक्री करणार असल्याची माहिती युनिट 2 चे पोलिस अमंलदार अमोल सरडे यांनी मिळाली. त्यानुसार दोघांनाही कॅम्प परिसरातून ताब्यात घेण्यात आले. यावेळी दोघांकडून चोरी करण्यात आलेली बोअर आणि काडतुसे जप्त करण्यात आली. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकडे, पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक नितीन कांबळे, अमंलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, नागनाथ राख, साधना ताम्हाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास उपनिरीक्षक शिवराज हाळे करत आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)