भरारी पथकाची धडाकेबाज कारवाई, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुसद (Electricity thief) : पुसद शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विज चोरी होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. वाशिम येथील भरारी पथकाचे प्रमुख कार्यकारी अभियंता सतीश मोरे व पथकातील सदस्यांनी पुसद मध्ये धडाकेबाज कारवाई करीत दोन चोरट्यांविरुद्ध पोलीस कारवाई केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 नोव्हेंबर रोजी एक वाजता च्या दरम्यान मी व माझे सहकारी सुभाष खराटे सहाय्यक अभियंता, अभिजीत ब्राह्मणे सहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी, गणेश कुबडे वरिष्ठ तंत्रज्ञ, संदीप देशमुख वरिष्ठ तंत्रज्ञ यांना गोपनीय खबर्यांमार्फत माहिती मिळाली की, गजानन महाराज मंदिर परिसरातील रहिवाशी राजेश अंबादास गवळी रा. पुसद घर क्रमांक829 यांच्या नावावर असून ते स्वतः विजेचा वापर करतात.
सदर वीज वापर (Electricity thief) हा व्यवसायिक प्रकारचा असून यांचा ग्राहक क्रमांक 386024583436 असा आहे.व विज tarifflt-ll असा आहे. सदर वीज ग्राहकांच्या मीटरची तपासणी केली असता, यामध्ये मीटर क्रमांक 43071039 मेक hpl कॅपॅसिटी 1040amp, रेव्यालुशन -1600 imp /kwh व मीटर रिडींग 26091 सदर मीटरची kwh आहे. अवैधरित्या आल्याचे दिसून आले. सदर मीटर हे अवैधरीत्या वायर जोडून मीटर पूर्णपणे बायपास करून वीज वापर सुरू असल्याचे आढळून आले. पंच व वीज वापरदार राजेश अंबादास गवळी सदर बाब यांच्या निदर्शनास आणून दिली. घटनास्थळी पंचनामा करून तर तपासणी अहवाल क्रमांक1669 करण्यात आला मीटर आहे त्या परिस्थितीत जप्त करून.
वापरदार व वाशिम येथील भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांच्या सहीने कागदी सील लावून जप्ती पंचनामा करण्यात आला. अधिक तपासणी केली असता राजेश गवळी यांच्या घरी पोल येणारा इनकमिंग सर्विस वायर मीटर च्या स्टंपिंग करून ग्राहकाच्या ऍक्वा वायरिंग इन्स्टॉलेशन ला एम एस ई बी ची व्यवस्था करून जोडण्यात आली. वीज कंपनीच्या परवानगी शिवाय जाणून-बुजून वीज चोरी केलीआहे. त्यांनी मागील बारा महिन्यापासून 6162 युनिट प्रमाणे 140370 ( एक लाख चाळीस हजार तीनशे सत्तर रुपयाची ) वीज चोरी केली. 19 नोव्हेंबर रोजी त्याचा भरणा केला.
तडजोड रक्कम चाळीस हजार रुपये याचा भरणा केला नाही. म्हणून शहर पोलीस ठाण्यात वाशिम येथील भरारी पथकाचे कार्यकारी अभियंता सतीश मोरे व त्यांचे सहकारी यांनी फिर्याद दाखल केली. त्यावरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विद्युत मीटरशी छेडछाड (Electricity thief) करून किंवा थेट तारावरून आकोडे टाकून वीज चोरी करणे कायद्याने गुन्हा आहे. भरारी पथकाने गेल्या आठ महिन्यात 221 विज चोरट्यांवर धडक कारवाई करीत दोन कोटी 63 लाख रुपये आठ हजार 77 रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी वीस जणांवर विद्युत कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये पुसद मध्ये दोन गुन्हे दाखल आहेत – सतीश मोरे कार्यकारी अभियंता जिल्हा भरारी पथक वाशिम .