सेनगाव (Sengaon Nagar Panchayat) : येथील नगर पंचायतमधील उपनगराध्यक्ष निखिल भाऊराव देशमुख यांनी २८ नोव्हेंबर रोजी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भविष्यात या पदावर कोणाची निवड केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सेनगाव नगर पंचायतमध्ये (Sengaon Nagar Panchayat) मागील अडीच वर्षापुर्वी निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी या नगरपंचायतवर महाविकास आघाडीचे वर्चस्व होते. त्यावेळी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीसाठी सव्वा सव्वा वर्षाचा करार ठरविण्यात आला होता. रोटेशन पध्दतीने झालेल्या करारानुसार नगराध्यक्ष पदी गायत्री गजानन देशमुख यांची तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेचे गट नेते तथा नगरसेवक निखिल भाऊराव देशमुख यांची निवड करण्यात आली होती.
ठरलेल्या कराराचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने निखिल देशमुख (Sengaon Nagar Panchayat) यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. तसेच हा राजीनामा नगराध्यक्ष गायत्री देशमुख यांना ही सादर केला. यावेळी शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, संदिप देशमुख, राजकुमार देशमुख, बद्री कोटकर, जगन्नाथ देशमुख, मुख्याधिकारी गांजरे आदीची उपस्थिती होती.