वसमत शहरातील लिटल इंग्लिश स्कुल मधील घटना
वसमत अप्पर सत्र न्यायालयाचा निकाल
हिंगोली (Vasmat execution case) : वसमत शहरातील आसेगाव रस्त्यावरील लिटील इंग्लिश स्कुलमध्ये रखवालदार काशिनाथ साहेबराव चौरे यांचा सासरा पंडितराव विठ्ठलराव पानधोंडे हा त्यास १ फेब्रुवारी २०२४ रोजी भेटण्यासाठी रखवालदाराच्या खोलीत आला असता त्यांच्यात तू सासुला का बोलतो असे म्हणून मयताने आरोपी व त्याची सासू या दोघांच्या चारित्र्यावर संशय घेतल्याच्या कारणातून वाद झाल्याने काशिनाथ साहेबराव चौरे यांनी मयतास लाकडी दांड्याने डोक्यात मारून ठार केल्याप्रकरणी (Vasmat execution case) वसमत शहर पोलिसात लिटल इंग्लिश स्कुलचे संचालक नामदेव कोंडबाराव दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काशिनाथ चौरे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
त्याचा तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी पाटील व त्यांचे रायटर केशव गारोळे यांनी करून आरोपी काशिनाथ साहेबराव चौरे रा.पुयणी खु.याला अटक करून पुरावे हस्तगत केल्यानंतर त्याच्या विरूद्ध न्यायालयात ३० एप्रिलला दोषारोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पोलीस साक्षीदार, वैद्यकीय पुरावा, पंच साक्षीदार व इतर सबळ पुराव्या आधारे अप्पर सत्र न्यायालय (Vasmat execution case) वसमत यांनी गुन्ह्यातील आरोपी काशिनाथ साहेबराव चौरे रा.पुयनी खु.याला २६ नोव्हेंबरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात सरकारी अभियोक्ता म्हणून एन.एच. नायक यांनी काम पाहिले तर कोर्ट नोडल अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक विनायक केंद्रे, कोर्ट पैरवी बेटकर, पतंगे यांनी कामकाज केले आहे.