नवीन निकष लागू होणार!
पुसद (Ladki Bahin Yojana) : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला यश संपादन करून देण्यात लाडकी बहिण योजना हा फॅक्टर गेमचेंजर ठरल्याचे दिसून आले आहे. महायुतीला प्रचंड असे यश मिळाले आहे. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाइकी बहिण योजना (CM Ladki Bahin Yojana) लागू केली होती, त्यानुसार पात्र महिलांना महिना पंधराशे रूपये मिळाले होते. निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांना पाच हफ्ते मिळाले आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री तथा सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी या योजनेमध्ये आता पंधराशे ऐवजी २१०० रूपये मिळणार असे आश्वासन दिले होते. मात्र आता शासनाने मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पूर्ण निकष लागू केले आहेत. त्यामुळे अपात्र महिलांना सहावा हफ्ता मिळणार नाही. लाडली बहिण योजनेच्या पोर्टलवर एक कोटी बारा लाख महिलांनी नोंदणी केली होती. त्यातील एक कोटी सहा लाख महिला पात्र ठरल्या आहेत, ज्या महिला संजय गाधी निराधार योजनेचा लाथ मिळवत आहेत त्यांनीही या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते.
मात्र आता सदर महिलांना लाडली बहिण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ मिळणार नाही असे बोलले जाते. संजय गाधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून सदर रकम वसूल करण्यात येणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असेल तर सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र काही एकत्रित कुटुंबामध्ये २१ वर्षे पूर्ण झालेल्या दोन-तीन अविवाहित मुलींनी अर्ज केला आहे. यापुढे सदर त्याचा लाभ मिळणार नाही. आता काटेकोरपणे पडताळणी केली जाणार आहे, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जादा आहे त्या महिलांनी अर्ज करू नये असे सांगितले
होते. मात्र तरीही काही महिलांनी अर्ज दाखल केले होते. आता त्यांना यापुढे (Ladki Bahin Yojana) योजनेचा लाभ मिळणार नाही. आता घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. जाच्याकडे चारचाकी वाहन नोंद आहे अशा महिलांनाही आता योजनेचा लाभ मिळणार नाही. आयकर भरणाऱ्या महिलांनाही यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत दीड हजार रूपये लाभ मिळत असल्यास त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, सर्व अर्जाची आता फेर पडताळणी केली जाणार आहे. डबल डोअर प्रोर, वाशिंग मशिन, स्पोर्टस बाईक चारचाकी वाहन दिसून आल्यास सदर योजनेचा लाभ मिळणार नाही.